चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह मानवी हक्काची लढाई - अँड. सिद्धार्थ शिंदे

 

 महामानव सार्वजनिक वाचनालय डॉ. बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन व थोर इतिहासकार मा.म.देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली

 बीड प्रतिनिधी - उच्च शिक्षण घेऊन विद्या विभूषित होऊन आपले संपूर्ण आयुष्यभर दीन दलित वंचित बहुजनांच्या व देशाच्या हिताकरता झटलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लढा मानव विकास करता व स्वाभिमानाची लढाई होती. त्यापैकी त्या काळात नैसर्गिक संपत्ती पासून देखील दीनदलित अस्पृश्य समाजाला सार्वजनिक मालकीच्या पाण्याला देखील स्पर्श करू देत नव्हते, त्याकरता डॉ. बाबासाहेबांनी फुले, शाहूंच्या विचाराने प्रेरित झालेल्या त्या काळातील उच्चवर्णी यांच्या बहुमोल सहकार्यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याकरता 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला होता. तो चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह मानवी हक्काची लढाई होती. त्या लढाईची स्मृति प्रेरणादायी आहे असे उद्गार अध्यक्षपदी लाभलेले अँड. सिद्धार्थ शिंदे यांनी काढले. महामानव सार्वजनिक वाचनालय धानोरा रोड बीड येथे महाडच्या सत्याग्रह "संग्राम दिन" म्हणून संपन्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. तसेच थोर इतिहासकार व बहुजनांच्या हिताकरता व त्यांना अंधश्रद्धा अनिष्ट रुडी परंपरा पासून दूर राहण्याकरता प्रखर लेखन करणारे थोर वक्ते प्राध्यापक मा.म. देशमुख यांच्या दुःखद निधनादिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प, पुष्पमाला अर्पण करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाकरिता वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले, सैनिक दलाच्या वंदना वाघमारे प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. विचार मंचावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले प्रा. अशोक गायकवाड, सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक यू.एस. वाघमारे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे यांनी तर सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुढे म्हणाले की सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या यशाकरता एका विशिष्ट समुदायाचा लढा न उभारतात सर्व समावेशक समाज हिताकरता सर्वांनी सहभाग नोंदवून जसा चवदार तळ्याच्या सत्याग्रहांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या मानवी हक्क च्या लढाई करता सुरभा नाना टिपणीस, गंगाधर सहस्त्रबुद्धे, अनंत चित्रे, शेख बांधव ज्यांनी सत्याग्रहाच्या मंडपाकरता जमीन दिली होती. असे शेख बांधव यांनी बहुमोल सहकार्य करून तत्कालीन हक्क व कर्तव्याची पूर्णपणे जाणीव ठेवून लढा दिला तर यश नक्की मिळते हे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह दीपस्तंभ प्रमाणे प्रेरणादायी आहे त्या काळातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे किशोर भोले वंदनाताई वाघमारे, सुजाता वासनिक यांनी महाडच्या सत्याग्रहाबद्दल व थोडी इतिहासकार मा.म. देशमुख यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे कार्यक्रमा अर्जुन जवंजाळ, एस.एस. सोनवणे,सुधाकर विद्याधर, विद्याधर नाणी, बि.डी. तांगडे, व महामानव अभिवादन ग्रुपचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार के.एस.वाघमारे यांनी व्यक्त करून सरणातयेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी