उच्च स्वप्नपूर्ती करिता जिद्द व चिकाटीच्या प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता प्रा. डॉ.नामदेव शिनगारे
उच्च स्वप्नपूर्ती करिता जिद्द व चिकाटीच्या प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता प्रा. डॉ.नामदेव शिनगारे
(महामानव अभिवादन ग्रुप तर्फे शालेय साहित्य वाटप)
बीड प्रतिनिधी- शिक्षण म्हणजे सत्य जाणणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून, दैववाद, किंवा अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरेतून, बाहेर पडल्याशिवाय उच्च स्वप्नपूर्ती करिता. जिद्द, चिकाटी व प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता आहे. अशी प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाट बांधावी असे प्रतिपादन प्रा. डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले.
महामानव अभिवादन ग्रुपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणजेच 2024 रोजी मिळालेले साहित्य वाटपाचा नव्या फेरीतील धानोरा रोड बीड नागसेन बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदी लाभलेल्या नागसेन बुद्ध विहार मंडळाच्या सचिव केशर कांबळे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.नामदेव शिनगारे , अँड तेजस वडमारे व एस.एस. सोनवणे यांच्या हस्ते 43 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेन) वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले , वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी. वानखेडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले याची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक गायकवाड यांनी तर सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक यु.एस. वाघमारे यांनी प्रस्तावित केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आदर्शाच्या प्रतिमेचे पुष्प व पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकांशी व विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना प्रा. शिनगारे पुढे म्हणाले की दीन, दलित, गरजू व वंचितांची सेवा हीच सेवा मानव कल्याणाची आहे. हा संत गाडगेबाबांचा बहुमोल उपदेश असू, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून त्या वैज्ञानिक प्रगतीला तथागताने सांगितलेल्या पंचशीलाची जोड दिल्यासच जगात शांतता व बंधुत्वाची वृद्धी होईल व जग विनाशापासून वाचेल असे अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. याप्रसंगी न्यू स्टार रायझिंग इंग्लिश स्कूलचे कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी अत्यंत सोप्या भाषेत बालकांना समजावून सांगितले की विद्यार्थीदशेत गुरुजनांची , पालकाची आज्ञा पाळणे व ज्ञान मिळवणे, तरुणपणी शील पालन करून दोन कमावले व म्हातारपणी सुख समाधानाने जगून होईल तेवढे समाज रोड फेडणे याबद्दल अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. दुसरे प्रमुख पाहुणे अँड. तेजस वाडमारे, यांनी स्पष्ट केले की विहारेही संस्कार केंद्रे व्हावीत व त्यामध्ये बालकांच्या मनावर सुसंस्कार होण्याकरता आपल्या पाल्यास दर रविवारी नियमितपणे विहारात आणून समाज प्रबोधनात्मक, तथागतांच्या , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीच्या सर्वच महापुरुषांच्या आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवावा याविषयी माता भगिनींना आग्रहाची विनंती केली. तर प्रशांत वासनिक यांनी ह्या इंटरनेटच्या जमान्यात त्याचा आपल्या प्रगती करिता सदुपयोग करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी.एम.राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करता नागसेन बुद्ध विहार महिला मंडळाच्या सर्व सदस्या व नंदिनी साबळे यांनी बहुमोल परिश्रम घेतले . कार्यक्रमास परिसरातील सोनी थोरात, विद्या कोरडे, छाया धनवे, अश्विनी साबळे, सागरबाई वीर, मनोहर कांबळे, के.एस.वाघमारे, इंजि उमाजी आठवले, संजय शिरसाठ, सुंदर तांगडे, निवृत्ती शिंदे, बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थिती होती सरणातयेने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment