जीवाची वाडी येथील जल जीवन योजना तात्काळ चालू करा ग्रामस्थाचं उपोषण


येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१९/मार्च-२०२५रोजी
केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन वर्षापासून जल जीवन योजनेचे काम मंद गतीने चालू असल्याने सध्याची मिषण पाणीटंचाई विचारात घेता गावातील ग्रामस्थ भागवत चौरे हे जीवाची वाडी येथील हनुमान मंदिरावर दि.१९ वेळ१०: ००वा.पासुन मरण उपोषणास बसले आहेत पंधरा दिवसात योजना कार्यनीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.
               
         क्षणचित्रे 
उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरिक्षक वैभव पाटील यांच्याशी भ्रम्हध्वनी वर संपर्क केला परंतु संपर्क झाला नाही नंतर पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस ठाणे,केज यांना तात्काळ कळवितो.पोलीस अधिक्षक कार्यालय,बीड
 
        
 उपोषण स्थळे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी दिसून आले नाहीत.

आमच्या प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता जल जीवन कार्यालय,बीड मुकुंद आंधळे यांच्याशी चार वेळा भ्रमध्वनी वरून संपर्क केला परंतु त्यांनी जानीव पूर्वक फोन घेतला नाही. 


उपअभियंता श्रीमती वंदना साळवे ग्रामीण पाणीपुरवठा उप विभागीय कार्यालय,केज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही यावरून असे दिसून येते की संबंधित विविध विभागाची यंत्रणा उपोषण कर्त्याच्या उपोषणाचे गांभीर्य घेत नसलेचे दिसून आले नाही.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी