विद्यानगर,सांकवाळ येथे थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार - संभाजीनगरचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांची ग्वाही
.
"छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य सेवा मंडळ, विद्यानगर" आणि अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत, गोवा शाखा" यांच्या संयुक्त विद्यमाने ३९५ व्या, तिथीनुसार शिवजयंती उत्सव सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संभाजीनगरचे आमदार दाजी साळसकर यांनी वरील उद्गार काढले.
विद्यानगर चौक सिग्नलला नेहमी फडकत असणारा भगवा ध्वज, शिवजयंतीचे अवचित्य साधून, जुना काढून नवीन बदलन्यात आला.
सिग्नल ते एम्.ई.एस्. कॉलेज पर्यंत,हनुमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रेरणा महिला मंडळातर्फे,लेझीम पथकाने शिवजयंती सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
एम्.ई.एस्.कॉलेज,वसंत जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात उर्वरित सोहळा संपन्न करण्यात आला.
संभाजीनगरचे आमदार श्री. कृष्णा (दाजी )साळकर आणि झेडपी सदस्य एडव्होकेट सौ.अनिता थोरात यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला.
रूमडेश्वर सांस्कृतिक महिला मंडळने स्वागत गीत गाऊन सोहळ्याची सुरुवात केली.
शाहीर मंगेश शेट्ये आणि ग्रुप, यांनी महाराजांचे पोवाडे सादर करून, सोहळ्याची रंगत वाढवली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, व्यासपीठावर नाट्यमयरित्या जिवंत करून "सुरनंदन कला शक्ती कुठ्ठाळी, बाल कलाकार आणि महिला ग्रुप प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला.
स्वराज्यधारा सांस्कृतिक संच मोरगाव- गोवा येथील ग्रुपने शिवगर्जना देऊन वातावरण प्रफुल्लित आणि जोशपूर्ण केलं.
सोहळ्यामध्ये केशव स्मृती प्रायमरी स्कूल,दाबोलिम विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
ओमीडा डान्स अँड फिटनेस समूह ताळगाव-पणजी यांच्याही सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
केसरवाल येथील बालकलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखा व्यासपीठावर सादर केल्या आणि श्रीहान चौगुले या चिमुकल्या कलाकाराने लाठी-काठी या मैदानी खेळाचे सुंदर सादरीकरण केले.
या सोहळ्याचे खास आकर्षण, भव्य-दिव्य सोहळ्याची उंची, आणखीन वरच्या स्तरावर नेण्याचं काम, पहाडी, कणखर, शाहिरी संवाद फेकीने, वेळोवेळी इतिहासाचा दाखला देऊन, ऐतिहासिक क्षण जागे करून, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालून, प्रेक्षकांना व्यासपीठाशी घट्ट खेळूवून ठेवण्याचं काम,सोहळ्याचे सूत्रसंचालक श्री. रामचंद्र पाटील (प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ, गोवा राज्य) यांनी केले.
सोहळ्यासाठी संभाजीनगरचे आमदार- दाजी साळकर,झेडपी सदस्य सौ.अनिता थोरात, दक्षिण गोवा भाजप, उत्तर भारतीय प्रकोष्ठचे अध्यक्ष-अजय लांबा, उल्हास फळ देसाई, निखिल शर्मा, जयवंत पाटील, सांकवाळ ग्रामपंचायतचे, सदस्य- संतोष देसाई, विद्यानगर रहिवासी कल्याण संघटनेचे अध्यक्ष- सागर तोरस्कर, विद्यानगर निवासी कल्याणकारी संघटनेचे माजी अध्यक्ष- मोनिश मेटी, कुठ्ठाळी ग्रामपंचायत, सरपंच सौ. उज्वला नाईक,अखिल भारतीय मराठा जागृती मंच, कुठ्ठाळी शाखेचे,माजी अध्यक्ष-नामदेव शिंदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सोहळ्यासाठी उपस्थित होते.
शिवजयंती सोहळा संपन्न करण्यासाठी अहोरात्र झटणारे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजाराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून शिव-भोजनाच्या आस्वादनंतर, तब्बल ६ तास चालणार्या सोहळ्याची सांगता केली.
Comments
Post a Comment