महामानव महिला नागरी पतसंस्थेच्या निवडी बिनविरोध
महामानव महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कौशल्या भोले, उपाध्यक्षपदी रेश्मा आठवले, तर सचिवपदी कावेरा इनकर यांची बिनविरोध निवड
बीड प्रतिनिधी - बीड येथील महामानव महिला नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक (२०२५-२०३०) बिनविरोध संपन्न झाली. संचालकानी नुतन पदाधिकारीची निवड बिनविरोध केली. अध्यक्षपदी कौशल्य गुलाबराव भोले, उपाध्यक्षपदी रेश्मा राजाभाऊ आठवले तर सचिवपदी कावेरा गौतम इनकर यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पिठासीन अधिकारी पी.एस. रोडे यांच्या उपस्थितीत दि. २०/०३/२०२५ रोजी संपन्न झाली. सर्व संचालकांनी अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले. सदर बैठकीस नवनिर्वाचित संचालिका नंदाबाई दळवी,विजया जौजांळ, विद्या डोळस,वंदना वाघमारे व प्रभारी व्यवस्थापक पूजा जोंजाळ उपस्थित होत्या. महामानव अभिवादन ग्रुप , पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद डी.जी.वानखेडे, जी.एम.भोले, ए.बी. जौजांळ, डी.एम.राऊत, एस.एस.सोनवणे, के.एस.वाघमारे, प्रा.अशोक गायकवाड, सुजाता वासनीक, प्रशांत वासनिक, यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालीका यांचा सत्कार केला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment