२ एप्रिल रोजी बीड मध्ये नियोजन बैठकीसाठी येणा-या उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री तथा नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून नाराजी व्यक्त करणार-डॉ.गणेश ढवळे
२ एप्रिल रोजी बीड मध्ये नियोजन बैठकीसाठी येणा-या उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री तथा नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून नाराजी व्यक्त करणार-डॉ.गणेश ढवळे
ऊन पावसात बसणा-या चिमुकल्यांना कोणी ईमारत देता का ईमारत ; बीड जिल्ह्यात १६०५ वरवगखोल्यांच्या दुरूस्ती गरज तर ५९२ वर्गखोल्या धोकादायक ; पालकमंत्री अजितदादांना काळे झेंडे दाखवणार :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२७ ) बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २४७६ शाळा आहेत. या शाळांमध्ये १०,४७९ वर्गखोल्या असून यातील ५९२ वर्गखोल्या आता धोकादायक असून या ठिकाणी अध्यापन करू नये असे शिक्षण विभागाने कळविलेले आहे. दरम्यान धोकादायक इमारतीतील विद्यार्थी मंदिर, ग्रामपंचायत आणि झाडांचा आसरा घेऊन ऊन पावसात बसत आहेत. या धोकादायक शाळांना कोणी इमारत देत का इमारत असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण विभाग, आमदार, खासदार, शिक्षणमंत्री यांना गेल्या ३-४ वर्षांपासून निवेदने आणि आंदोलने करूनही शासन याकडे गांभीर्याने पहात नसल्याने दि.२ एप्रिल रोजी बीड मध्ये नियोजन बैठकीसाठी येणारे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून तिव्र नाराजी व्यक्त करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे.
सविस्तर माहितीस्तव
यु-डायस २०२३-२४ च्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २४७६ शाळा आहेत. सदर शाळांमध्ये चांगल्या वर्ग खोल्यांची संख्या १०,४७९ आहे. पैकी ७७९ वर्ग खोल्यांची किरकोळ दुरुस्ती व ८५६ वर्ग खोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या ३४९ शाळांमध्ये ५९२ वर्गखोल्या धोकादायक आहेत. परंतु धोकादायक असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अध्यापन करण्यात येऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे या खोल्यांमध्ये शैक्षणिक कामकाज केले जात नाही. ज्या वर्ग खोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे अशा शाळाच्या वर्ग खोल्यांना छप्पर, भिंती, फरशी, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती व रंगकामाची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्ती करता व नवीन वर्ग खोल्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ अनेक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ . गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलने केलेली आहेत. परंतु शासन ज्ञानमंदिरे बांधण्यासाठी निधी देताना हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे .
मागील वर्षी मिळालेला निधी
सन २०२३-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी ),पंधरावा वित्त आयोग, जिल्हा परिषद फंड, गौण खनिज योजना या योजनेअंतर्गत उपलब्ध निधीच्या मर्यादेत १३० शाळांमधील ३१५ वर्गखोल्या दुरुस्तीसाठी ८ कोटी २९ लाख रुपये दिलेले आहेत. धोकादायक असलेल्या वर्ग खोल्यांपैकी ७३ वर्ग खोल्यांच्या बांधकामाकरिता व पत्र्याच्या शेडमध्ये भरणाऱ्या २५ शाळांकरीता करता २५ वर्ग खोल्या बांधकामासाठी असे एकूण ९८ वर्गखोली बांधकामा करिता रुपये १२ कोटी ७५ लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत अनेक शाळांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. कार्यारंभ आदेश होऊनही शाळांची कामे केली जात नाहीत. काही ठिकाणी दुरुस्ती ऐवजी नव्याच शाळा बांधाव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
बीड जिल्ह्यातील तालुका निहाय धोकादायक वर्गखोल्यांची संख्या
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या धोकादायक वर्ग खोल्यांची संख्या तालुका निहाय खालील प्रमाणे आहे.आष्टी ११९, आंबेजोगाई ३०, बीड ३७, धारूर ३०, केज २२, गेवराई १२५, माजलगाव २६, परळी ८८, पाटोदा ४०, शिरूर ३२ वडवणी ४३ एकूण ५९२
५५ कोटींचा नव्याने प्रस्ताव
५४१ वर्गखोल्यांच्या मोठ्या दुरुस्तीकरता १३ कोटी १४ लाख ६३ हजार रुपयांचा निधी व ५१९ धोकादायक वर्ग खोली बांधकाम व पत्र्याच्या शेडमध्ये भरणाऱ्या ३८ शाळांमध्ये ३८ वर्गखोली बांधकामासाठी असे एकूण ५५ कोटी ७० लाख रुपये निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.
५९२ धोकादायक वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे :- भगवान फुलारी , शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.बीड
जिल्ह्यातील ५९२ वर्गखोल्या धोकादायक असून त्या ठिकाणी अध्यापन करू नये असे मुख्याध्यापकांना कळविलेले असून तेथील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शाळांना निधी मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. शासनाकडून अपेक्षित निधी मिळेल असे वाटते अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.बीड भगवान फुलारे यांनी दिली.
पालकमंत्री अजितदादांना काळे झेंडे दाखवणार :- डॉ.गणेश ढवळे
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ज्ञानमंदिरांना निधी मिळावा यासाठी शिक्षण विभागापासुन जिल्हाधिकारी ते आमदार, खासदार, शिक्षणमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आहेत आणि आंदोलने केलेली आहेत.परंतु शासनाला याविषयाचे गांभीर्य नसुन दि.२ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड यांना आम्ही काळे झेंडे दाखवून नाराजी व्यक्त करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथ मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment