राज्यातील 560 गोशाळांना देशी गोवंश परिपोषण योजनेचा लाभ वितरण म्हणजे नवसंजीवनी-बाजीराव ढाकणे



बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले जेष्ठ समाजसेवक सन्माननीय शेखर भाऊ मुंदडा यांनी महाराष्ट्र राज्यातील गोमाता संकटात सापडलेल्या आहेत हे हेरले व गोमातांच्या संगोपनासाठी काही तरी आगळीवेगळी योजना सुरू करण्याचे ठरविले आणि मागिल २ वर्षांपासून अहोरात्र परिश्रम घेत देशी गोवंश परिपोषण योजना कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी व मंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा करून योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणून महाराष्ट्र राज्यातील ५६० गोशाळांना गुरुवार दिनांक २७ मार्च रोजी जानेवारी ,फेब्रुवारी व मार्च या ३ महिन्यांचे अनुदान म्हणून २५ कोटी रुपये संबंधित गोशाळांच्या बॅक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले आहेत. याबद्दल महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांनी सन्माननीय शेखर भाऊ मुंदडा यांचे आभार मानले आहेत.

गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन प्रति गाय ५० रुपये अनुदान योजनेअंतर्गत दि २७ मार्च २०२५ रोजी राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६९ हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आले.

देशी गायींची कमी झालेली उत्पादन क्षमता,त्यांचे संगोपन तसेच भाकड किंवा अनुत्पादक गायींचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतुने सन २०२४- २०२५ मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणार्‍या गोशाळांना शासनाने गोवंश परिपोषण योजना सुरु केली.अनेक गोशाळांना यातून फायदा तर झाला आहेच त्यासोबतच देशी गोवंश संगोपनामध्ये मदत झाली आहे.

या महत्वपूर्ण योजनेच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब,पशुसंवर्धन मंत्री मा.पंकजाताई मुंडे व महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा सन्माननीय शेखर भाऊ मुंदडा तसेच सर्व प्रमुख अधिकार्‍यांचे महा एनजीओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.

ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा असणार्‍या देशी गोवंशाला या योजनेच्या लाभामुळे मिळणारी नवसंजीवनी येणार्‍या काळात देशी गोवंश वृद्धीसाठी आणि संगोपन - संवर्धनासाठी फायद्याची ठरेल....

श्री बाजीराव ढाकणे
सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा समन्वयक, महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी