बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था "चाळणी झालेल्या रस्त्यांवर अजितदादा अवतरले" मुखवटे घालून लक्ष्यवेधी आंदोलन
बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था "चाळणी झालेल्या रस्त्यांवर अजितदादा अवतरले" मुखवटे घालून लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२४ )बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असुन ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे,वाळुमिश्रित खडीचा धुराळा उडत असुन अपघातांची संख्या वाढली असुन चाळणी झालेल्या रस्त्यावरून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बीड शहरातील ११० कोटी रुपयांच्या ४० फुट रूंदीच्या १७ मुख्य रस्त्यांच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत राज्याच्या नगरविकास विभागाकडे वर्षभरापूर्वी पाठविण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला असुन त्यास तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसह धुळे ते सोलापूर रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवुन रखडलेले दुभाजकांचे काम पूर्ण करून साईडपंखे भरण्यात यावेत. बीड ते अहिल्यानगर मार्गाचे काम संथगतीने होत असुन प्रमुख शासकीय कार्यालये असणाऱ्या रस्त्यांवर गर्दी होत असुन जलदगतीने पुर्ण करण्यात यावे या मागण्यांसाठी सामाजिक
सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ वार सोमवार रोजी वाजता कारंजा टॉवर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपरिषद बीड कार्यालय अजितदादा पवार यांचे मुखवटे घालून चाळण झालेल्या रस्त्याची पाहणी करत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,सुदाम तांदळे, मुबीन शेख,, शेख मुस्ताक, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले आदी सहभागी होते. मुख्याधिकारी नगरपरीषद बीड निता अंधारे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.
बीडमधील १७ मुख्य रस्ते मंजुरीचा प्रस्ताव लालफितीत अडकला असुन त्यांना मंजुरी देऊन निधी देण्यात यावा.
बीड नगर पालिकेने एक वर्षापूर्वी बीड शहरातील ११० कोटी रूपयांच्या ४० फुट रूंदीच्या १७ मुख्य रस्त्यांच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवलेला प्रस्ताव लालफीतीत अडकला आहे. शहरातील नगर रोड ते पालवण चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते संतोषीमाता मंदिर, राजुरी वेस -बलभीम चौक -माळीवेस , बलभीम चौक ते दगडी पुल,थिगळे कॉम्प्लेक्स ते जालना रोड, जिजामाता चौक ते मसरतनगर अशा एकुण शहरातील १७ अत्यंत महत्त्वाच्या प्रमुख रस्त्यांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी बीड नगरपालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे.१७ रस्ते ४० फुट रूंदीचे होणार असुन त्यासाठी ११० कोटी रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत होणार आहेत. बीड शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असुन चाळणी झालेल्या रस्त्यावरून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.शहरात वर्दळीचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज ते कारंजा टावर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असुन वाळु मिश्रित खडीचा धुरळा उडत आहे. वाहनांचे अपघात होत आहेत.त्यामुळे तातडीने प्रस्ताव मंजूर करून रस्त्यांसाठी निधी देण्यात यावा.
धुळे ते सोलापूर शहरांतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुभाजकांचे अर्धवट काम पूर्ण करून साईडपंखे भरण्यात यावेत
शहरातील धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बार्शी नाका ते राष्ट्रवादी भवन पर्यंत मागील अनेक वर्षांपासून मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असुन या खड्ड्यात वाहने आदळुन अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या मार्गावरील जालना रोड वरील दुभाजकांचे काम अर्धवट असुन दुभाजकांसाठी जागा सोडण्यात आली असुन त्याठिकाणी माती टाकण्यात आली आहे.त्यामुळे रस्ता ओलांडताना वाहनांची चाके फसुन अपघाताच्या घटना घडत आहेत.तर दुसरीकडे महामार्गावरील मुख्य सिमेंट रस्त्याच्या बाजुचे साईडपंखे भरण्यात आले नसुन दुचाकी वाहनचालकांचे घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
इ) मागणी क्रमांक ३
बीड ते अहिल्यानगर महामार्गाचे बीड शहरातील काम संथगतीने असुन जलदगतीने पुर्ण करण्यात यावे
बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बीड ते अहिल्यानगर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र काम करणाऱ्या ठेकेदार यंत्रणेने नियोजन शून्य काम केल्याने दीड वर्ष लोटूनही शहरातील दोन किलोमीटर अंतराचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. बालेपीर पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला असला तरी काही भागातील खड्डे ,रस्त्यांचे जोड कायमच आहेत. या ठिकाणी खडी, धुराळा उडून वाहन चालकांना त्रास होतो. या रस्त्यावर जिल्हा न्यायालय, समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभागाचे कार्यालय ,मुख्य प्रशासकीय इमारत अशी ६६ शासकीय कार्यालय असल्याने दुचाकीची वाहतूक मोठी आहे. त्यामुळे कायम गर्दी असते त्यामुळे संथगतीने चालणारे रसत्याचे काम जलदगतीने पुर्ण करण्यात यावे.
Comments
Post a Comment