निविदेमध्ये (टेंडर) गोलमाल करून मर्जीतील गुत्तेदारांना पोसणाऱ्या कार्यकारी अभियंता स्वामी यांचे निलंबन करा-लोक जनशक्ती पार्टी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 18 3 2025 रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या केज धारूर अंबाजोगाई परळी येथे अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे शासन नियमानुसार प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टेंडर प्रोसेस आणि वर्क ऑर्डर करणे परंप्राप्त असते पण अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग येथील कार्यकारी अभियंता स्वामी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून फेब्रुवारी महिन्यात या कामाची टेंडर प्रोसेस आणि वर्क ऑर्डर करून आपल्या संबंधित गुत्तेदारांना हे टेंडर मिळवण्यास मदत केली आहे सामान्य गुत्तेदारांना कामे मिळू नयेत म्हणून अनेक कामांचे क्लबिंग केले जाते त्यामुळे सामान्य गुत्तेदारांना काम मिळणे अवघड होत आहे त्यातच शासन नियमानुसार 25 लाख ते पाच कोटी टेंडर प्रोसेस कालावधी दहा दिवसाचा असताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तो नियम न धरता सात दिवसांचा कालावधी करून टेंडर आणि वर्क ऑर्डर करून घेतलेले आहेत तरीही मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देऊन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांची चौकशी करून तत्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांच्या कार्यालयासमोर लवकरच आमरण उपोषण करण्यात येईल या आशयाचे निवेदन मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश भाऊ वाहुळे व मुंडे उपस्थित होते
Comments
Post a Comment