मनसे व म्हाळसा यांच्या डान्स स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
मनसे व म्हाळसा यांच्या डान्स स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
महिला मुलींनी नोंदवला अभूतपूर्व सहभाग
बीड प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे संकल्पनेतून व म्हाळसा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित डान्स स्पर्धा २०२५ ला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची सुरुवात छ.शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रा. दुष्यंता रामटेके, बीड प्रसारचे संपादक समीर काझी, दैनिक पार्श्वभूमीचे आनंद वीर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, म्हाळसा प्रतिष्ठानच्या सचिव मयुरीताई बाबर यांचे समवेत दुसरे मान्यवर करीत झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी केले.
डान्स स्पर्धेत महिलांच्या व मुलींच्या सहभागाची नोंद घेण्यात आली, ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जागतिक महिला दिन निमित्ताने साजरा करण्यात आला.
यावेळी, डान्स स्पर्धेत सहभागी महिला व मुलींनी आयोजक वर्षाताई जगदाळे यांचे आभार मानून महिलांना एक स्वतंत्र व्यासपीठ दिल्याबद्दल प्रशंसा केली. या पहिल्याच डान्स स्पर्धेने एकत्रित प्रतिभा आणि सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी एक चांगला मंच प्रदान केला आहे, ज्यामुळे महिला सशक्तीकरणाच्या पथावर एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी एक अद्भुत अनुभव ठरला, आणि भविष्यातील स्पर्धांसाठी एक सकारात्मक संदेश गेला.
Comments
Post a Comment