रविवारी रंगणार पवनराजे इंग्लिश स्कूलमध्ये लहान- चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन
स्नेहसंमलन सोहळ्यास उपस्थित रहा-सौ. प्रणिता खंडेराव चौरे
केज । प्रतिनिधी
केज येथील नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा पवनराजे इंग्लिश स्कूलमध्ये येत्या रविवारी (२३ मार्च) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाट्य, गायन आणि भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेच्या व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक मान्यवर, शिक्षण तज्ञ आणि पालक उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी जोरदार तयारी केली आहे . शाळेमधे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात त्यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष तथा केळगाव-बेलगाव च्या सरपंच सौ . प्रणिता खंडेराव चौरे तसेच मुख्याध्यापक अशोक मस्के, रामेश्वर घुले याच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment