डॉ.अशोक थोरात यांचे निलंबन मागे घेण्यात यावे,अन्यथा ५ एप्रिला आत्मदहन करणार - रोहन गलांडे पाटील
केज/ प्रतिनिधी
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात साहेब यांचे निलंबन ५ एप्रिल २०२५ पर्यंत मागे घेतले नाही तर ५ एप्रिल २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा रोहन गलांडे पाटील यांनी सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे की शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात साहेब यांचे निलंबन ५ एप्रिल २०२५ पर्यंत मागे घेतले नाही तर ५ एप्रिल २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला देतो निवेदनाद्वारे देण्यात येत आहे तरी मला आंदोलना दरम्यान काही झाले तर सरकार, प्रशासनान जबाबदार राहील यांची नोंद प्रशासनाने तातडीने घेऊन माझी मागणी मान्य करण्यात यावी अशी मागणी रोहन गलांडे यांनी सरकारला व प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात केली आहे. बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात कथित भ्रष्टाचार केला असा आरोप केज मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी विधान सभेत लक्षवेदी लावुन चुकीच्या व सुड बुध्दीने कार्यावाही केलेली आहे म्हणून सकल बहुजन समाज, केज तालुका यांच्या वतीने सुध्दा डॉ. अशोक थोरात यांच्यावर केलेली कार्यवाही नात्काळी मागे घ्यावी अन्यथा केज तालुक्यात तिवृ स्वरुपाचे आंदोलन करु असे निवेदन यावेळी देण्यात आले आहे यावेळी उपस्थित युवा नेते राहुल खोडसे ,अंबाड योगेश,राधाताई सपकाळ,निर्मला सातपुते ,लखन हजारे, धपाटे,कदम यावेळी उपस्थित होते .
Comments
Post a Comment