पाण्याचा काटकसरीने वापर करून उत्पादनात वाढ करण्याची बोरखेड येथे शेतकऱ्यांनी घेतली शपथ



" पाणी हेच आपले जीवन आहे " - जलप्रेमी बाजीराव ढाकणे 

      बीड प्रतिनिधी. :- रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी जलजागृती सप्ताहानिमित्त मौजे बोरखेड ता जि बीड येथील यशोदिप शेतकरी बचत गटांच्या शेतकरी सदस्यांनी सहभागी होत आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतीच्या उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे अशी संकल्पना करून सर्वांनी मिळून पाण्याचा काटकसरीने वापर करूया असा निर्णय घेत शपथ घेतली. यावेळी जलप्रेमी बाजीराव ढाकणे, बाळासाहेब गावडे यांच्यासह यशोदिप शेतकरी बचत गटांचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, सचिव विठ्ठल घरत , सदस्य विठ्ठल शिंदे, महादेव गावडे , आदम खॉ पठाण , बाबु बोराटे सुशिल बोराटे, गोरख अनपट, दत्ता सोनटक्के, खंडु सगळे इत्यादींची उपस्थिती होती.  
_------------------------------------
राज्यात १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान साजरा केला जातो " जलजागृती सप्ताह " या निमित्ताने आपणही पाणी जपून वापरले पाहिजे 
                 पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीसाठी पाणी आवश्यक आहे. मानव, प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाच्या संतुलनासाठी पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

 - जलप्रेमी ,बाजीराव नवनाथ ढाकणे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी