विविध मागण्या; रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण

विविध मागण्या; रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण.

सफाई कामगारांना पुर्ववत कामावर रुजू करून घ्यावे, प्रमुख मागणी.
बीड प्रतिनिधी (२४ ) बीड शहरातील मागील २० महिणे झाले कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून पुर्व सुचना न देता मुख्याधिकारी निता अंधारे मॅडम यांनी कामा वरुन कमी केले आहे . कामगारांना कामावर रुजु करून घ्यावे या प्रमुख व ईतर मागण्यासाठी केंद्रिय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वात सोमवार दि. २४ मार्च २०२५ सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली असल्याची माहिती 
 रोजंदारी मजदुर सेना केंद्रिय महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे . कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय हक्क सोई सुविधा प्राप्त व्हाव्यात म्हणुन सनदशीर कायदेशीर मार्गाचा अवलंब करत धरणे निदर्शने आंदोलन दरम्यान महिला कामगारांना सलग आठ दिवस कारागृहात डांबुन ठेवण्यात आले , राजेशकुमार जोगदंड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सलग १८ दिवस अन्नत्याग उपोषण केले परंतु आर्थिक निधीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे पत्र देत आंदोलनकर्त्यांची फसवणुक झाली असल्याचे कळवले आहे , आज पर्यंत बीड येथील कंत्राटी सफाई कामागारांना कामावर न घेता बेरोजगार केले , त्यांच्या कुटुंबियांनावर उपासमारीची वेळ आली असून, आर्थिक अवस्था अत्यंत हलाखीच्या झाल्या आहेत. तर दुसरी बाजु अशी कि , नियमित कचरा साफ सफाई करणारे अपुरे कर्मचारी आहेत, जर त्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर स्वच्छता कर्मचारीच अपुरे आहेत असे कारण बीड नगर परीषद सांगत आहे. परीणामी नागरीकांचे अबाल वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जनतेनेच स्वच्छतेबाबत जाब विचारावा‌ असे आवाहन भाई गौतम आगळे सर यांनी केले आहे. तरदुसरीकडे आपण स्वच्छ भाजीपाला किंवा ईतर खरेदी साठी बाजारात जातो तिथे ग्राहकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
 कर वसुलीचे जाहिर लिलाव मुख्याधिकारी, न.प. बीड आदेशीत करु शकता परंतु शहरातील स्वच्छता अबाधित राहावी म्हणुन घनकचरा व्यवस्थापन माध्यमातुन स्वच्छतेसाठी निविदा जाहीर करुन शकत नाही . कंत्राटी सफाई कामगारांसहीत नागरीकांच्या आरोग्याशी बीड नगर परीषद द्वेष भावनेतुन क्रुर खेळ खेळत आहे . कारण कंत्राटी सफाई कामगारांना पुर्ववत कामावर रूजु करुन घ्यावे लागेल , म्हणुन निधीचे कारण पुढे करत न्यायासाठी कायदेशीर मार्गाने संघटनेच्या माध्यमातुन संघर्ष करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना २० महिन्यां पासुन बेरोजगार केले आहे . कंत्राटी सफाई कामगारांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघटनेच्या माध्यमातुन संघर्ष करणार असे अन्नत्याग उपोषणकर्ते भाई राजेशकुमार जोगदंड यांनी सुतोवाच केले आहे. जिल्ह्यांतील सर्व कंत्राटी कामगारांना हजेरी वेतन कार्ड ( नियम २७ ) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ची पावती व इतर सर्व सुविधा तात्काळ देण्यात याव्यात. कामगार विभागाच्या वतीने कार्यरत कंत्राटदार जर कामगार कायदे पाळत नसतील तर त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सोमवार दिनांक: २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. तसे निवेदन 
 संबंधित मंत्री महोदय व सनदी अधिकारी यांना ईमेल करण्यात आले होते. परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्याने नियोजित अन्नत्याग उपोषण सुरू केले असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर, यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी