राडी सर्कल मधील ग्रामस्थांनी केला अशोक हिंगे यांना विजयी करण्याचा संकल्प
वोट देणार त्यासोबत नोटही देणार अंबाजोगाई / प्रतिनिधी बीड लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस क्रेझ वाढू लागली असून आता तर नागरिकांनी नोट बरोबर वोटही देणार! असा संकल्प करीत अशोक हिंगे पाटील यांना बीड लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याची सुरुवात राडी सर्कलमधील ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मधील शिल्लक राहिलेली देणगी 21 हजार रुपये अशोक हिंगे पाटील यांना निवडणुकीसाठी देणगी म्हणून देऊन केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी ही लोकसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे आता नागरिकांमधून बोलले जात आहे. अशोक हिंगे पाटील यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिकांनीच अशोक हिंगे पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रचार सुरू केला असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. याचाच एक भाग म्हणजे अशोक हिंगे पाटील हे अंबाजोगाई तालुक्यातील राडी सर्कल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी गेले असता येथील ग्रामस्थांनी अश...