वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उसळला जनसागर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उसळला जनसागर


 शहरात सर्वत्र निळ्या, पिवळ्या, आणि भगव्या झेंड्याचं वादळ

 सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली ची सुरुवात
 बीड प्रतिनिधी:- बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन केले व भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत रेखाताई ठाकूर, विष्णू देवकते, डॉ.नितिन सोनवणे,सचिन उजगरे, पुरुषोत्तम वीर,बबनराव वडमारे, बालाजी जगतकर,किरण वाघमारे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 निवडणुकीचे रणधुमाळी जोरात चालू आहे बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आज रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तक्त बदलना है अपनी सत्ता लाना है अशा घोषणा देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, शाहीर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरात सर्वत्र निळे पिवळे आणि भगव्या झेंड्यांचा वादळ दिसत आहे भव्य दिव्य रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले उमेदवार अशोकराव हिंगे पारस नगरी मैदानावर समारोप होणार आहे यावेळी ऍड प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत सभा होईल असं सांगितलं

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी