महामार्गावर चारचाकी वाहनांच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- आज दि.२३ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी साडे ५ वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश परीसरात संगीत शाळेजवळ संगीत शाळेचे संचालक महादेव जगदाळे यांनी चारचाकी वाहनाच्या धडकेत एक शिंग तुटलेले व एक पाय मोडलेल्या गंभीर जखमी अवस्थेत काळवीट दिसून आले. जगदाळे यांनी लिंबागणेश येथील विक्रांत वाणी यांना कल्पना दिली.विक्रांत वाणी हे लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे. संतोष राऊत व बाबासाहेब डोंगरे यांच्या सोबत घटनास्थळी भेट दिली.जखमी काळवीटला स्कार्पिओ गाडीत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणण्यात आले. डॉ.गणेश ढवळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बीड अशोक काकडे, वनरक्षक डोळस मडम यांच्याशी फोनवरून संपर्क करून जखमी काळवीटाची कल्पना दिली. डोळस यांनी वनविभागाची गाडी गेवराई येथे गेल्याने पोहचु शकत नसल्याचे सांगितले.विक्रांत वाणी यांनी स्वतःच्या स्कारपिओ गाडीतुन काळवीटाला औषधोपचारासाठी घेऊन गेले त्यांच्या समवेत संतोष वाणी आणि वनकर्मचारी आनिल शेळके हजर होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी