बालाघाटच्या प्रत्येक नागरिकाचे मत म्हणजे पंकजाताई मुंडेना मत--पवन कुचेकर


(बीड  प्रतिनिधी) बीड लोकसभेची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली असतानांच बालाघाटच्या गावागावात जाऊन भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे  बीड तालुका अध्यक्ष असणारे पवन कुचेकर यांनी थेट मतदारांशी सवांद साधत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. बालाघाटावरील गावागावातील मतदाराशी भेटी दरम्यान यंदा सुध्दा बीड जिल्हयात कमळ फुलनार असुन बालाघाटावरील नागरिकांचे मत यंदा सुध्दा भारतीय जनता पार्टीला अर्थात पंकजाताई मुंडेनाच अशी ग्वाही या भागातील मतदार देत असुन, स्वर्गीय गोपिनाथराव मुंडेवर प्रेम करणारा या भागातील मतदार  ,आमचं मत म्हणजे विकासाला मत असल्याचे मतदार बोलत आहेत. एकीकडे पंकजाताई यांच्या प्रचारार्थ बीड जिल्हयातील नामवंत नेतेमंडळी झंझावती दौरै करत असतांनाच ,भाजपाच्या अनुसुचित जाती मोर्चाचे  बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर हे आपल्या बालाघाटच्या डोंगररांगेतील सर्व सर्कल मध्ये जातीने जाऊन ताईसाहेबांना खासदार करण्यासाठी फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. पवन कुचेकर हे भाजपाच्या अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष जरी असले तरीही, पवन कुचेकर यांच्या पाठी युवकांची मोठी फौज आहे, तसेच मातीतल्या माणसांशी आपुलकिची नाळ त्यांची जोडली गेलेली आहे, मुळात बालाघाटावरील गावागावातील नागरिकांची मुंडे कुटुंबावर अपार अशी श्रध्दा आहे. त्यामुळे बहुजन नागरिकांसह सर्व जाती धर्माच्या सुजान नागरिकांनी यावेळी सुध्दा पंकजाताई मुंडेना मत म्हणजे विकासाला मत ही खुणगाठ बांधुन ठेवली आहे ,बीड जिल्हा म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो.त्यामुळे आपल्या बीड जिल्हयातुन स्वर्गीय मुंडेच्या कन्या असणार्या पंकजाताई यांना महाराष्ट्रात सगळयात जास्त लिड देऊन दिल्लीच्या संसदभवनात पाठवण्याचा मानस बीडच्या नागरिकांनी ठरवलेला आहे.आदरणीय पकंजाताई मुंडे यांना बहुजन जनतेचा मोठया प्रमाणावर पांठिबा मिळत असुन पंकजाताईसाहेबाचा विजयी निश्चित असुन बहुजन जनतेने कोणाच्याही भुलथापाना बळी न पडता पंकजाताई मुंडे यांना प्रंचड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी केले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी