महायुती उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आप्पासाहेब राख यांचा पाटोदा तालुक्यात झंझावात


पाटोदा (प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणुकीच्या भाजपा, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे ह्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना जातीपाती अथवा गाव न पाहता त्यांनी पाटोदा तालुक्यातील प्रत्येक गावांना भरघोस निधी उपलब्ध करून विकास कामे केले आहेत.त्यामुळे आपले अमूल्य मत वाया न घालता पंकजाताई यांना मत म्हणजे विकासाला मतदान असे प्रतिपादन ज्येष्ठनेते आप्पासाहेब राख यांनी केले.ते बीड लोकसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माजी ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पाटोदा तालुक्यातील गावा गावातील नागरिकांना भेट देऊन संवाद साधत आहेत जेष्ठ नेते आप्पासाहेब राख यांचा झंझावात सुरू असुन महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ गावा गावातील मतदारांच्या भेटीगाटीवर त्यांनी भर दिला आसुन पालकमंत्री धनंजय मुंडे, खा.प्रीतम ताई मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना केलेला विकास कामे पाटोदा तालुक्यातील मतदारांना सांगत आसुन बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मतदान करून बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राख यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी