उद्धव ठाकरे साहेबांवर टिका करण्याएवढी सुरेश धसांची लायकी नाही- शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर
शिवसेना जिल्हाप्रमुखांचा सुरेश धसांवर हल्लाबोल
बीड, दि.२५ (प्रतिनिधी)- भाजपाच्या व्यासपीठावरून भाषण करताना आमदार सुरेश धस यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याविरोधात बेताल बडबड केली. ठाकरे साहेबांवर टिका करण्याएवढी सुरेश धस यांची लायकी नाही. देवस्थानच्या जमिनी हडप करणार्या धसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी सुरेश धस यांचे प्रयत्न दिसत आहेत असा हल्लाबोल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी केला.
प्रसिद्धी पत्रकामध्ये जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी म्हटले. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे सुरेश धस निवडणुकीच्या दरम्यान स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिका करत होते. त्या निवडणुकीत सुरेश धस यांचा पराभव झाला. स्वार्थासाठी पक्ष बदलणार्या सुरेश धस यांना दुसर्यांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही. चारा छावण्यामध्ये शेण खाणारे सुरेश धस देवस्थानच्या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा भाजपाला खूष करण्याचा प्रयत्न आहे. ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे कधीच काम करत नाहीत असा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. स्वार्थासाठी जसे कपडे बदलतो तसे पक्ष बदलणार्या सुरेश धसांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांची लायकीही नाही अशा शब्दात शिवसेनेने सुरेश धसांना फटकारले इथून पुढं आमचें दैवत उद्धव साहेबांवर बेताल वक्तव्य केल्यास सुरेश धसांना जिल्ह्यात फिरू देणारं नाही असा इशारा जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला
Comments
Post a Comment