विनापरवाना अवैद्य वृक्षतोड सुरु, मालकी क्षेञातील झाडांचे भवितव्य धोक्यात?
पाटोदा (प्रतीनिधी) पाटोदा वनक्षेञातील पाटोदा परिसरात अवैद्य वृक्षतोड सुरु असुन वन कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, पाटोदा वनपरिक्षेञातील नफरवाडी, येवलवाडी, पारगांव, दासखेड, मंझरीघाट, पाचंग्री, सावरगांव इत्यादी गावांमध्ये वनविभागाचे क्षेञ नसल्याने वनकर्मचार्यांची गस्त अत्याल्प प्रमाणात होत आहे. याचा गैरफायदा घेत लाकुड व्यापारी मालकी क्षेञातील लिंब, बाभुळ, चिंच, आंबा इत्याद वृक्षांची विनापरवाना तोड करुन अवैद्य रित्या वाहतुक देखील करत आहेत. या गंभीर परस्थितीची नोंद घेवून वन अधिकारी व कर्मचारी यांनी सदर परिसरात नियमीत गस्त करुन अवैद्य वृक्षतोडीस लगाम घालणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment