बीड लोकसभेसाठी महा - राष्ट्र विकास आघाडीचे चंद्रकांत हजारे एक विश्वासक चेहरा - अँड अण्णाराव पाटील

आम्ही स्वतःच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी लोकसभेच्या आखाड्यात 

बीड लोकसभेसाठी महा - राष्ट्र विकास आघाडीचे चंद्रकांत हजारे एक विश्वासक चेहरा - अँड अण्णाराव पाटील

बीड प्रतिनिधी 
आज राज्यात आणि देशात राजकीय परिस्थिती विदारक झालेली आहे.देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासोबतच हा देश वाचवण्याची देखील नैतिक जबाबदारी आता आपल्यावर आली आहे.यामुळे कोणाचाही द्वेष न करता महा - राष्ट्र विकास आघाडी जाहीरनामा नव्हे तर एक उद्देशिका समोर ठेवून लोकसभेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे.आम्ही महाराष्ट्रात 15 ते 16 ठिकाणी उमेदवार उभे करणार असून आम्हाला सामान्य मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वर्धा, बुलढाणा, परभणी, नगर, माढा, मुंबई, लातूर,नाशिक या ठिकाणी उमेदवार उभे केलेले असून बीड लोकसभेसाठी आम्ही चंद्रकांत हजारे या सामान्य चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली आहे. ते नक्कीच बीडकरांचे आश्वासक म्हणून लोकसभेत जातील असा विश्वास पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
बीड येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता महा - राष्ट्र विकास आघाडीची राजकीय भूमिका सांगण्यासाठी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड अण्णाराव पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर बीड लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत हजारे यांच्यासह अँड अनिरुद्ध येचाळे, निखिल भातांब्रेकर, राजाभाऊ सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अण्णाराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना राष्ट्रीय पातळीवर 2009 मध्ये करण्यात आली. आम्ही यावेळी देशातील, राज्यातील राजकीय अस्थिर परिस्थिती लक्षात घेता या देशाला, देशातील संविधानाला आणि आदर्श लोकशाहीला वाचवण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आमचा पक्ष नवीन आणि सामान्य परंतु स्वाभिमानी जनतेचा आहे.आमच्याकडे धनसंपत्ती नाही. मात्र या देशाला वाचवण्याची, लोकशाहीला टिकवण्याची आणि संविधानाला संवर्धन करणारी विचारांची प्रगल्भता आमच्याकडे आहे. हेच सकारात्मक विचार घेऊन आम्ही मतदारांमध्ये जागृती करत आहोत. आम्ही प्रामुख्याने देव,धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभेद विरहित राजकारण असा नारा दिला आहे. या सोबतच राष्ट्रीयत्वाला प्राधान्य, कर्जमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारा निर्णय, मोफत आणि दर्जेदार ते ही एकसमान शिक्षण, तरुणाच्या हाताला कामासह उद्योग, व्यापार आणि नंतर नोकरी, नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी, शेत मालासाठी किफायतशीर दर देण्याचा निर्धार असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधींचे भत्ते पेन्शन कायमचे बंद तरच देशातील विकास कामावर लक्ष देता येईल असा आमचा विश्वास आहे,तसेच मंदिर,मज्जित,गुरुद्वार, विहार यांच्यासाठी होणारा शासकीय खर्च कपात करणे, उपेक्षित वंचित विस्थापितांसाठी सत्ता असा नारा देत आम्ही लोकसभा निवडणुकीच्या विकास यात्रेत सहभागी झालो आहोत. आज देशात राज्यात एकही राजकीय पक्ष विश्वासाला पात्र नसल्याने आम्ही कुणासोबतही युती, महाआघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळेच बीड लोकसभेसाठी आम्ही सामान्य कुटुंबातील चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्या मधून घडलेला सामान्य नेता चंद्रकांत हजारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना बीड जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लोकसभेच्या सभागृहात ते बीडकरांचे एक आश्वासक चेहरा म्हणून जातील असा विश्वास अँड अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

चौकट 
प्रस्थापित, धनाड्यांना बाजूला ठेवून यावेळी मतदार माझ्या विजयाची शिट्टी वाजवणार - चंद्रकांत हजारे

बीड जिल्ह्याने मातब्बर लोकप्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणासाठी दिले. मात्र या राज्यकर्त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास न करता स्वतःचा विकास केला. त्यामुळे आजही ऊसतोड मजुरांचा मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. हे या जिल्ह्याचे खरे दुर्दैव आहे. आज सत्तेसाठी विरोधक असलेले बहिण भाऊ एकत्र आले आहेत.शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना त्यांनी देशोधडीला लावला आहे. कुठल्याही विकासाचे प्रकल्प जिल्ह्यात राबवले गेले नाहीत अशा उमेदवारांना जनता नाकारेल तर दुसरे उमेदवार एक नव्हे दोन कारखान्याचे मालक आहेत. त्यांचे राजकीय चारित्र्य जनतेने पाहिलेले आहे.शेतकरी पुत्र म्हणणारे एवढ्या झटपट करोडपती कसे झाले हे जनतेला कळून चुकलेले आहे. त्यामुळे 2024 मध्ये बीडकरांनी भाकरी फिरवण्याचा निर्णय पक्का केला असून प्रस्थापित आणि धनदांडग्यांना बाजूला ठेवून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बीड लोकसभा निवडणुकीत विजयी करतील आणि महा - राष्ट्र विकास आघाडीच्या विचारांना स्वीकारून विजयाची शिट्टी स्वीकारून ती मतपेटीतून वाजवतील असा विश्वास बीड लोकसभेचे महा - राष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हजारे यांनी व्यक्त केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी