खा.प्रीतमताई,पंकजाताई मराठा आरक्षणासाठी काय केले !कायम मराठा आरक्षण विरोधी भाजप पक्ष आहे - रोहन गलांडे पाटील



केज/प्रतीनीधी
आज पहायला गेलो तर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे ज्यावेळी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभारला त्यावेळी प्रीतम मुंडे खासदार होत्या त्यांना साधी बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून साधी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही व सभागृहात सुध्दा प्रीतम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण विरोधी भाष्य व्यक्त केले व आज लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत ऐकदा सुध्दा मराठा आरक्षणाच्या बाजुने बोलल्या नाही उलट मराठ्यांचे दैवत जरांगे पाटील यांच्या वर टीका केली यांची जागा नक्कीच मराठा बांधवांनी दाखवली पाहिजे असे मत रोहन गलांडे पाटील यांनी व्यक्त केले.तसेच काही मराठा बांधव मराठा द्रोही निघत आहेत त्यामुळे त्यांना सुध्दा येणाऱ्या काळात मराठा बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे अशी ही भावना रोहन गलांडे पाटील यांनी व्यक्त केली आहे.तरी सकल मराठा समाज बांधवांनी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या अमर उपोषणाला यश मिळुन देण्यासाठी व आपल्या जातीसाठी माती खायला काय हरकत आहे म्हणून सकल मराठा समाज बांधवांनी भाजपच्या उमेदवारांला आपले अनमोल मत देऊ नये व आपल्या मराठा आरक्षणासाठी , आपल्या मराठा आरक्षणाच्या बाजुने बोलणाऱ्या आपल्या तालुक्यातील आपल्या मराठा बांधवांना लोकसभा निवडणूकीत अनमोल मत द्यावे व आपल्या केज तालुक्यातील मराठा समाजाचा लोकसभेच्या उमेदवारांला निवडुन द्यावे असे मत रोहन गलांडे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी