संविधान वाचविण्यासाठी रोजंदारी मजदूर सेनेचा अशोक हिंगे पाटील यांना बिनशर्थ पाठिंबा - भाई गौतम आगळे
परळी (प्रतिनिधी) रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे.
देशात व महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांचे शोषण चालू आहे. कामगार कायदे, शासन परिपत्रक असून सुद्धा त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी जातीयवादी शक्ती, शोषण करणारी प्रवृत्ती कंत्राटी कामगारांना तुच्छतेची वागणूक देत आहेत. तसेच देशाची राज्यघटना बदलू पाहणाऱ्या संविधान विरोधी कृत्य करून लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजपा सारख्या जातीवादी विचारधारेला रोखण्यासाठी पुरोगामी विचारांच्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी प्रामाणिक राहून वंचित घटकाला सत्तेत बसवण्यासाठी मागील 40 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. त्यांनी बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे त्यांना रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी बीड येथील सभेत बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रसंगी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड, जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे, संगीता साबळे, रुक्मिणी जोगदंड, बबीता तांगडे, रेश्मा बोराडे, सुनीता जोगदंड,आशाबाई कांबळे, कौशल्या जाधव, बीना सौदा यांच्यासह बहुसंख्येने महिला कामगार उपस्थित होत्या, अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्ध पत्रकार दिली आहे.
Comments
Post a Comment