आम आदमी पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी सैनिक अशोक येडे यांची फेरनिवड
बीड प्रतिनिधी :-बीड जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे कार्य पाहता व पक्षाशी निष्ठा राहून मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या विचार घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात कष्ट करणारे व सर्व जिल्ह्यांमध्ये संघटन बांधणीसाठी अतोनात प्रयत्नशील रात आहे संविधानिक मार्गाने सामाजिक मार्गाने व संविधान वाचवण्यासाठी सोबत जनतेचे प्रश्न वेळोवेळी मांडून आंदोलन करून जनतेमध्ये आम आदमी पार्टीचा मान उंचावण्याचे कार्य केले असून या सर्व गोष्टी पाहता आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार महाराष्ट्राचे प्रभारी मा. दीपक सिंगला महाराष्ट्राचे सहभागी गोपाल भाई इटालिया महाराष्ट्राचे सह प्रभारी अजित फटके पाटील मा. रंगाराचुरे प्रचार समिती प्रमुख महाराष्ट्र राज्य मा. संग्राम गाडगे पाटील संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य या सर्व वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास करून व माझ्या कार्याला न्याय देऊन दुसऱ्यांदा जिल्हा अध्यक्ष पदाची जिम्मेदारी सोपवल्याबद्दल या सर्व वरिष्ठांचे आदेश पाळुन बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टी घराघरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करीन व सर्वांचा विश्वास पात्र होण्याचा प्रयत्न करणे सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य नागरिक या निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत
Comments
Post a Comment