तळणेवाडी गेवराई येथे क्रांती महिला असंघटित कामगार युनियनची बैठक संपन्न
गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) - क्रांती महिला संघटित कामगार युनियनची तळणेवाडी येथे संघटनेच्या अध्यक्षा शाहीन पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे समन्वयक कडुदास कांबळे उपस्थित होते.
तळणेवाडी येथे झालेल्या बैठकीची प्रस्तावना रोहिणी राऊत यांनी केली. प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितले की, तळणेवाडी येथील ६५ महिला संघटनेच्या सभासद झाल्या आहेत. संघटनेचे ओळखपत्र त्यांना दिले आहे संघटनेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मिळण्यासाठी कुटुंब नोंदणी अर्ज भरून घेतले आहेत. लवकरच हे अर्ज ग्रामसेवक यांच्याकडे सुपूर्त करण्यात येतील.
या बैठकीमध्ये पुढील कामाच्या पाठपुराव्यासाठी तळणेवाडी येथील महिलांच्या वतीने अध्यक्ष- शेख मुन्ना मुराब, उपाध्यक्ष- शेख शहाना युसुफ, सचिव- दुर्गा प्रभाकर लाड, तर संघटक म्हणून सुनीता कल्याण जगताप अशी बहुमताने कमिटी नियुक्त करण्यात आली. कडूदास कांबळे यांनी यावेळी उपस्थित क्रांती महिला संघटित कामगार युनियनच्या सभासद महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी शाहीन पठाण, मंगलताई राठोड, कविताताई डोंगरे, मार्गदर्शन केले.
क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सदस्यांचे आभार रोहिणी राऊत यांनी मांडले आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment