सर्व राजकीय पक्षांच्या लोकसभा उमेदवारांना जनतेचा जाहीरनामा देणार-लोकशाही मित्र कडूदास कांबळे



 गेवराई, दि. 27 ( प्रतिनिधी ) देशातील 24 राज्यातील दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त, असंघटित क्षेत्रातील कामगार अशा  वंचित समूहात  जाऊन 50 हजार बैठका घेऊन जनतेचे खरे प्रश्न काय आहेत? याविषयी चर्चा करून  90 पानी जनतेचा जाहीरनामा  ( "A People's Agenda") प्रसिद्ध केला आहे. 
      क्रांती महिला असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य संघटना तसेच जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने    "A People's Agenda" सर्वच राजकीय पक्षांच्या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देणार असल्याची माहिती सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते लोकशाही मित्र कडुदास कांबळे यांनी माहिती दिली आहे.
        हा निवडणूक जाहीरनामा दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त, असंघटित क्षेत्रातील कामगार, आणि वंचित समूहाच्या प्रश्नांशी संबंधित आहे. या जाहीरनाम्यातील प्रश्न लोकसभा उमेदवारांनी जनतेसमोर मांडावेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा पक्ष आणि आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासित करावे. जनतेच्या जाहीरनाम्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वच राजकीय पक्षांकडे आणि निवडून आलेल्या उमेदवाराकडे पाठपुरावा करणार आहोत असेही कडूदास कांबळे यांनी सांगितले आहे. या बैठकीस क्रांती महिला संघटित कामगार युनियनच्या अध्यक्षा शाहीन पठाण, तसेच मराठवाडा अध्यक्ष मंगल ताई पवार यांनीही मार्गदर्शन केले. 
          या बैठकीसाठी क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या अध्यक्ष शाहीन पठाण, मंगलताई पवार, कविता डोंगरे, शकुंतला घुंगासे, मनीषा शरणांगत, रोहिणी राऊत, शितल गहिरे, काझी सुमेरा या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग होता. क्रांती महिला संघटित कामगार युनियनच्या संजयनगर गेवराई येथील कार्यालयात झालेल्या बैठकीचे प्रस्ताविक आणि आभार मनीषा शरणागत यांनी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी