अपक्ष उमेदवार म्हणून सौ. शितलताई धोंडरे यांची उमेदवारी दाखल


बीड - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदारसंघांसाठी सौ. शितल शिवाजी धोंडरे यांची अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला.
 गेवराई विधानसभा मतदासंघातील जातेगाव येथील सौ. शितल शिवाजी धोंडरे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज रोजी प्रथम जातेगाव येथिल ग्रामदेवता यमाई देवी चे दर्शन घेवून सिरसदेवी मार्गे गढी फाटा, त्या नंतर पाडळशिंगी टोल नाका मार्गे पेंडगाव येथील मारुती दर्शन घेऊन त्यांनी बीड बायपास येथे येऊन कॅनरा रोडवर असणाऱ्या उत्तम नगर जवळ आदरणीय दिवंगत मा.आमदार स्वर्गवासी विनायक राव जी मेटे साहेब यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन बीड मधील जालना रोडला माघारी येऊन सह्याद्री हॉस्पिटल चौकातून मोंढा रोडनी मोंढा चिंचेच्या कॉर्नर वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे दर्शन घेऊन पुन्हा पुलावरून माळीवेस मार्गे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मधील महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे दर्शन घेऊन पुढे स्टेडियम रोड मार्गे साठे चौक मधील अण्णाभाऊ साठे स्मारकाचे दर्शन घेऊन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन तिथून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय नगर रोड बीड इथपर्यंत पायी येऊन शक्ती प्रदर्शन करून माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी