शिव अल्पसंख्याक सेनेच्या बीड जिल्हासंघटकपदी सय्यद नयुमभाई

 बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात रहाणारे व पुर्वी रिपब्लिकन सेनेचे सक्रिय काम करणारे व युवक व समाजात चांगली क्रेझ असणारे नयुमभाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संपर्क नेते सुनिलजी प्रभु ,व संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार वजिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली तीन महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची काम करण्याची एकनिष्ठता व मेहनत बघुन जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या शिफारशीनुसार पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क नेते सुनिलजी प्रभु व संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शिव अल्पसंख्याक सेनेच्या बीड जिल्हा संघटकपदी निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांनी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी वरेकर म्हणाले की , इमानेइतबारे तळमळीने काम करणाऱ्या शिवसैनिकास मी न्याय देण्यासाठी कटिबद्ध असुन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज रहावे व येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दयावी कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ महुवाले , तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन ,विधानसभा प्रमुख सुशिल भैय्या पिंगळे , कामगार नेते रविअणणा वाघमारे , अल्पसंख्याक सेनेचे तालुकासंघटक नसीर भाई पठाण , रमेश नवले,शेख कलिम , गणेश ढोरमारे ,अझर शेख ,राजु बेग , सय्यद वसीम ,जावेद पठाण ,सोनू शेख ,शफिक शेख , शेख हकीम ,शाहरुख शेख ,रईस शेख , रियाज खान , यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी