चंद्रकांत हजारे महा-राष्ट्र विकास आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार,बीड लोकसभेत परिवर्तन घडवा अँड.अण्णाराव पाटील
बीड प्रतिनिधी:- महाराष्ट्र विकास आघाडीने बीड लोकसभेसाठी चंद्रकांत कुमार हजारे यांना उमेदवारी बीड लोकसभेसाठी रणसिंग फुंकले आहे.
बीड येथील नीलकमल हॉटेल येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सविस्तरपणे मार्गदर्शन केले यावेळी पक्षाची ध्येय धोरणे यावेळी त्यांनी स्पष्टपणे सर्व पत्रकार बांधवांना समजून सांगितले. प्रस्थापित दोन्हीही उमेदवारांना आपण या निवडणुकीत थारा देऊ नये. त्यांना घरी बसवावं नवीन व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. यांनी आतापर्यंत फक्त पिळवणूक केली आहे. अशांना घरी बसवा.या पत्रकार परिषदेत उमेदवार चंद्रकांत कुमार हजारे यांनी देखील आपण या मतदारसंघातील विकासात्मक भूमिका घेऊन निवडणूक लढवत आहोत.एक वेळ या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्यावी. यावेळी बोलताना सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित अँड.अनिरुद्ध येचाळे,निखिल भातंब्रेकर, राजाभाऊ सुळ आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment