ग्रुप ग्रामपंचायत जाटनांदुर सह शिरूर तालुक्यातून बजरंग बाप्पा यांना मतपेटीतून आशीर्वाद भरभरून भेटणार

ग्रुप ग्रामपंचायत जाटनांदुर सह शिरूर तालुक्यातून बजरंग बाप्पा यांना मतपेटीतून आशीर्वाद भरभरून भेटणार
 शिवसेना ठाकरे उपजिल्हाप़मुख खेडकर /शिवसेना तालुकाप्रमुख सोपान काका मोरे

आष्टी ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) : 
  खरंतर ही निवडणूक जातीपातीच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणारी ही निवडणूक असून ,जनतेच्या मनामध्ये देखील बदल हवा ही भावना निर्माण झालेली आहे , म्हणून जनतेच्या मनातील बदल कोणताही उमेदवार करू शकत नाही ?आणि तसं जर बघितलं तर मागील १० ते १५ वर्षापासून खरोखर विकास हा रखडलेला असून , अनेक रोडचे कामे , खेड्यापाड्याने रस्ते नाहीत ?लाईट सारखे सोय सुविधा अजून देखील नाही ?पाण्याची सोय नाही ?ग्रामीण भागात जाटनांदूर ग्रुप ग्रामपंचायत सारख्या गावामध्ये सरकारी दवाखान्याची सोय असायला हवी पण , अशी सोय नाही , कॉलेज , चांगल्या शाळा, विद्यापीठ या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतः काम करत आहोत या सगळ्या गोष्टी आम्हालाश्र भावी पिढीसाठी आम्हाला त्या अवेलेबल कराव्याच लागणार आसलयाने , बजरंग बाप्पा हा उमेदवार फायनलच ! शिरूर शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी साधं ग्राउंड देखील नाही ? शिरूर शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात देखील भटकंती करावी लागते ? ही मोठी शोकांतिका असल्याने ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार असून , असे असंख्य प्रश्न असुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या , शेतीमालाला हमीभाव , पैठण सारख्या तलावातील शिरूर शहरासाठी शिरूर ग्रामीण साठी पाणी उपलब्ध करणे , सहकारी साखर कारखाना शिरूर तालुक्यात एक उभारणे , म्हणजे रोजगार उपलब्ध होईल आम्हाला पाणी उपलब्ध झालं तर आमचा शिरूर तालुका प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही। जर या छोट्या/मोठ्या एमआयडीसी सारख्या गोष्टी शिरूर मध्ये जर झाल्या तर, आमच्या भावी पिढींना युवा तरुणांना पुणे /मुंबई /सोलापूर /कोल्हापूर या शहराने रोजगारासाठी भटकंती करण्याची गरज पडणार नाही, पुणे/ मुंबई/ कोल्हापूर /सोलापूर देश विदेश जाणाऱ्या मुलांना जर कधी तुम्ही प्रश्न केला की रोजगार आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये भेटला तर परोडेल का बाहेर शहरात परोडेल तर , ते उदासीन होऊन सांगणार की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावा शेजारी रोजगार जर उपलब्ध झाला तर दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन राहण्याची इच्छा कुठल्याच मुलांच्या मनामध्ये नसते ,पण पर्याय नसतो म्हणून रोजगारासाठी भटकंती करावी लागते . आणि ती भटकंती आपल्याला थांबवायची , काहीही झालं तरी आपल्याला थांबवायची म्हणून बजरंग बाप्पा यांना भरभरून मतदान कसं होईल आणि एक बोलका खासदार आपल्याला दिल्लीत कसा पाठवता येईल हे पाहणं फार गरजेचे आहे , म्हणून शिरूर तालुक्यातील असंख्य जनतेला नम्रतेची विनंती करण्यात येते की , बजरंग बाप्पांना मतदान पेटीतून खूप भरभरून आशीर्वाद द्याल ,अशी अपेक्षा करतो . शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे बजरंग बप्पा यांच्या पाठीशी खंबीरपणे शिरूर तालुक्यासह आष्टी / पाटोदा या मतदारसंघांमध्ये उभी आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचार अर्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख किशोरजी चंद्रकांत पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , सहसंपर्कप्रमुख लक्षराज सानप यांच्या उपस्थितीत , व लोकसभा प्रमुख सुनील दादा धांडे ,शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर जी सातपुते सर यांच्या आदेशाने आष्टी/ पाटोदा/ शिरूर या मतदारसंघातील शिवसेना बजरंग बाप्पा यांच्या प्रचाराला तन - मंन कामाला लागलेले आहेत . बजरंग बप्पा यांचा विकासाच्या मुद्द्यावर या मतदारसंघाची प्रगती व्हावा , या अनुषंगाने बजरंग बप्पा यांचा विजय अटळ असल्याचे , शिवसेना ठाकरे उपजिल्हाप़मुख खेडकर ,व तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात सागितले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी