मधुकरजी जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेत करण्यात आला साजरा
इन्फंट इंडिया येथील अनाथ मुलांच्या सोबत केक कापण्यात आला, व जिव्हाळा शहरी निवारा बेघर केंद्र येथे अन्नदान करून वाढदिवस साजरा
बीड प्रतिनिधी:- रियांश अमृत ज्यूस च्या माध्यमातून आरोग्य देणारे व रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा सीएमडी मधुकरजी जाधव सर यांचा वाढदिवस इन्फंट इंडिया आनंदग्राम येथील अनाथ लहान मुलांचे सोबत केक कापून साजरा करण्यात आला तसेच तेथील मुलांना बिस्किटे फळे देऊन आगळावेगळा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला वायफळ खर्च टाळून बीड शहरातील जिव्हाळा शहरी निवारा बेघर केंद्र येथील वयोवृद्धांना अन्नदान करून साजरा करण्यात आला या उपक्रमामुळे रियांश टीम डायमंडचे सतीश वडमारे व प्लॅटिनम डायरेक्टर प्रियंका शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यासाठी त्यांना डबल Daimond शेख जमील सर, शेख दस्तगीर सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास सुरज धनवे, लखन वाघमारे, विकास जोगदंड, बंटी वडमारे इत्यादी उपस्थित होते
Comments
Post a Comment