Posts

Showing posts from March, 2023

उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबीर संपन्न

Image
  गेवराई - उप जिल्हा रुग्णालय येथे आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साबळे , आर एम ओ डॉ आव्हाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवनीकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ कदम यांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जागरूक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत लघु शास्त्रक्रियेसाठी संदर्भ सेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली व 22 विद्यार्थ्यांवर डॉ राऊत सर्जन व डॉ.शिंदे भुलतज्ञ यांच्यामार्फत लघु शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ आंधळे, डॉ.मिसाळ, डॉ.शेख, डॉ.अरबड, डॉ.जाधव, डॉ.पवार, डॉ सबा, डॉ.सावंत, डॉ.तिडके, डॉ.अंकुश औषधनिर्माण अधिकारी सय्यद वसीम,अमोल झिरमिटे,सय्यद आसेफ, आरोग्य सेविका रंजना वसावे,निता शिंदे,अर्चना गवळी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली.

रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल. : ह.भ.प. श्री.प्रशांत महाराज क्षीरसागर

Image
चौसाळा --विवेक कुचेकर : अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्त पहिल्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा ह.भ.प.श्री.प्रशांत महाराज क्षीरसागर( विसाव्या शतकातील महान संत विभूति वै. ह.भ.प. श्री.ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज,श्री क्षेत्र चाकरवाडी येळंब घाट ) यांची झाली. रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी ।ह्रदयमंदिरीं स्मरे कारे ॥१॥आपुली आपण करा सोडवण ।संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥३॥ रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल.हृदय मंदिरी श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात.या अभंगावर त्यांनी   अतिशय समाज प्रबोधन सुंदर असे चिंतन या ठिकाणी केलं. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज हीच खरी संपत्ती. या अभंगावर चिंतन करत असताना नरदेह दुर्लभ आहे तो नाशिवंत असून क्षणभुंगुर आहे. तरीही ईश्वराची परमक कृपा प्राप्त करण्याचे एकमेव साधन आहे. स्वहित साधावयाचे असेल हा भवशिंदू पार करायचा असेल. तर सद्गुरू क

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि विचार अंगीकारले पाहिजेत - डॉ. सारिकाताई क्षीरसागर

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि विचार अंगीकारले पाहिजेत - डॉ. सारिकाताई क्षीरसागर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन बीड दि.३१ (प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर शिक्षणावर भर दिला.ते ज्ञानाचे भंडार होते. त्यांनी विचारांची लढाई लढली त्यांची शिकवण आणि विचार अंगीकारले पाहिजेत,असे मत डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड च्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड च्या वतीने आंबेडकर चौक,यशवंत उद्यान,पेठ बीड येथे भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर ह्या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व प्रतिमेला डॉ.सारिकाताईंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. व या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड च्या वतीने

जिल्हाधिका-यांच्या पाणीटंचाई आराखड्याकडे पाटोदा तहसिल कार्यालयाचा कानाडोळा; भायाळा साठवण तलावातुन पाणी उपसा सुरूच

Image
  ___ बीड जिल्हाप्रशासनाने हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल-निनोचा प्रभाव मान्सुनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणवु नये यासाठी आराखडे बनवण्यासाठी दि.२४ मार्च रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती सभागृहात बैठक आयोजित केली होती त्यात उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातुन आजही अनाधिकृत विद्युत मोटारी द्वारे पाणी उपसा सुरूच असुन संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत प्रधान सचिव महाराष्ट्र शासन स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  तहसिलदार पाटोदा यांनी महासांगवी, बांगरवाडी तलावांना भेट मात्र भायाळा साठवण तलावाकडे दुर्लक्ष  ___ दि.२७ मार्च रोजी तहसिल कार्यालय पाटोदा येथे उपविभागीय आधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली तसेच य

बीडमध्ये भव्य दिव्य सर्वरोग मोफत महाआरोग्य शिबीर.

Image
रुग्ण मित्र फाउंडेशन, ममता हॉस्पिटल व स्किनोवेशन क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने बीडमध्ये भव्य मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - बाळासाहेब धुरंधरे, रविकिरण गिरी (गोसावी) बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत व माफक दरात चांगली आरोग्य सेवा मिळावी व प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत उच्च दर्जाची ट्रीटमेंट पोहचावी हाच ध्यास हाती घेऊन रुग्ण मित्र फाउंडेशन, ममता हॉस्पिटल, व स्किनोवेशन क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात लवकरच भव्यदिव्य मोफत व माफक शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबीर दिनांक ०९/ ०४/ २०२३ वार रविवार, ममता हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय समोर, नगर रोड, बीड, येथे आयोजन केले असून या शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व गरजु रुग्णांची मोफत शुगर व ब्लडप्रेशर तपासणी, मोफत केली जाणार आहे. तसेच उर्वरीत इतर मोठ्या आजारांच्या रक्त तपासणी मध्ये ५०% सवलत दिली जाणार आहे. तसेच सोनोग्राफी, व इतर रक्त तपासणीत ५०% सवलत दिली जाणार आहे. या शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधींचे वाटप केले जाणार असुन, गंभीर आजारांच्या रुग्णांना माफक दरांमध

वंचित बहुजन आघाडीच्या महत्वपूर्ण बैठकीत उपस्थित रहा किशोर भोले

Image
बीड प्रतिनिधी  :-सखाराम पोहेकर गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी दिनांक दोन एप्रिल 2023 रोजी गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथेदुपारी ठीक बारा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीस उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी असे आव्हान केले या बैठकीमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या गेवराई तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्व तयारी संदर्भात गेवराई तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सर्कल प्रमुख गन प्रमुख गेवराई शहरातील बूथ प्रमुख यांच्या संघटनात्मक बांधणीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या मराठा धनगर माळी व बंजारा समाजातील नेत्यांचा पक्ष प्रवेश प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे यावर्षी तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू गायक

स्टोरीटेल मराठीचे "एप्रिल पुल"!

Image
लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, वक्ते, पटकथालेखक, नाटककार, नकलाकार, कवी, संगीतकार, गायक, पेटीवादक, अभिनेते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आपले भाई उर्फ पु.ल. देशपांडे. जगभरातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी 'स्टोरिटेल मराठी' एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. एप्रिल महिना हा स्टोरिटेल मराठीवर "एप्रिल पुल" असणार आहे. पुलंच्या पुस्तकांची 'ऑडिओ बुक्स' संपूर्ण एप्रिल महिनाभर विश्वभरातील रसिकांना ऐकता येणार असल्याने खऱ्या अर्थाने रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दर आठवड्याला पुलंचे एक लोकप्रिय पुस्तक नामवंतांच्या सुस्पष्ट आवाजात 'ऑडिओ बुक्स' फॉरमॅटमध्ये 'स्टोरिटेल मराठीवर' ऐकता येईल. हा महिना एप्रिल फुल! करण्याचा नाही!! तर स्टोरीटेलवर 'एप्रिल पुल' ऐकण्याचा आहे! या महिन्यात स्टोरीटेलवर दर चार दिवसांनी पुलंचे नवे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे. १ एप्रिल रोजी 'गुण गाईन आवडी' मधील काही लेख प्रकाशित होतील तर ४ एप्रिलला 'मैत्र' हे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे!! एप्रिल महिन्यातील 'एप्रिल पुल' मध्ये दर आठव

स्वराज्याचा बेकायदेशीर मज्जित विरुद्ध आक्रोष.

Image
( १५ दिवसात बेकायदेशीर बांधकाम हटवल नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर बांधकामाच नारळ फोडनार ) स्वराज्य पक्ष यांच्यामार्फत चुंचाळे घरकुल येथील बेकायदेशीर मज्जित हटवण्याबाबत अंबड पोलीस स्टेशन चे पोलीस अधीक्षक सुरज बिजली यांना निवेदन.  एकीकडे राज्यभर अनधिकृत मज्जित काढण्याबाबत निवेदन देण्यात येत आहे. व काही ठिकाणी मंजीच्या बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यास सुरुवातही झालेल्या आहे तसंच प्रकारात नाशिकमध्ये चुंचाळे घरकुल या ठिकाणी स्वराज्याच्या वतीने उघडकीस आणला व या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मज्जिद पहिल्यापासून नसून ती अलीकडच्या काळामध्ये तयार केली गेली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे अतिक्रमण त्वरित हटवावे या मागणीसाठी अंबड पोलिसांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी भाजप युवा मोर्चा ने त्यांचा पाठींबा दर्शवीला.  यावेळेस अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी त्या ठिकाणी जाणार असून त्या ठिकाणाची पाहणी करून योग्य ती कारवाई करू अशा आश्वासन दिले.  याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे,जिल्हाध्यक्ष आशिष हिरे , ज्ञाने

मुख्याधिकारी, प्रशासक यांच्यावर कारवाई करण्याची धमक जिल्हाधिकारी महोदयां दाखवतील का ? - भाई गौतम आगळे

Image
 परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या मुलभूत अधिकारा पासून वंचित ठेवणारे बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व प्रशासक, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी महोदया दिपा मुधोळ - मुंडे करत असल्याचे दिसून येत आहे. असा गंभीर आरोप कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केला आहे.  ‌ कामगार कायदे, शासन परिपत्रक, शासन निर्णय, मा. न्यायालयाचे आदेश आणि तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे निर्देश सुध्दा मुख्याधिकारी, प्रशासक नगरपरिषद / नगरपंचायत बीड जिल्ह्यातील सर्वजण पाळत नाहीत हे सर्व सनदी अधिकारी असुन लोकसेवक आहेत. ते पद व अधिकाराचा गैर वापर करून घटनेचे कलम ४६ व ५२ चे उल्लंघन करत आहेत असे दिसून आले. भारतीय दंड संहितेच्या १२४ - अ देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो, तसेच मानसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी अनुच्छेद २३ या कलमा द्वारे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे लेखी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तशी धमक जिल्हाधिकारी बीड महोदया दिपा मुधोळ - मुंडे दाखवतील का ? असा खडा सवाल र

ईट ते गुंदा वडगाव गुंदावाडी ते वडगाव या रस्त्यासाठी आम आदमी पार्टी रस्ता रोको आंदोलन करणार-दादासाहेब सोनवणे, पिंपळनेर सर्कल प्रमुख आम आदमी पार्टी

Image
बीड प्रतिनिधी :-बीड आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या विचाराने प्रेरित होऊन माननीय रंगाराचुरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्षआम आदमी पार्टी याच्या उपस्थितीत व भीमराव कुटे तालुका अध्यक्ष दादासाहेब सोनवणे पिंपळनेर सर्कल प्रमुख यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीच्या वतीने मोजे ईट ते वडगाव व गुंडवाडी ते वडगाव ता. जि. बीड हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 29 /07/ 2018 रोजी पूर्ण झाला परंतु इंजिनीयर गुत्तेदार यांच्या संघन मताने या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले तरी या रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे हमीपत्र आहे तरी गुत्तेदार व इंजिनियर या रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार नाहीत वारंवार सार्वजनिक बांधकाम मा. कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बीड महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था योजना बीड यांना देखील पत्राद्वारे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली हा रस्ता गुंदा वडगाव गुंदा वाडी गुंजाळा आडगाव या पा

निकहत जरीन बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन या पाच शब्दांनी साकारला पोट्रेट

Image
बीड (प्रतिनिधी ) - शहरातील शाह आर्ट्स चे सय्यद खमर यांनी आपल्यात असलेल्या नैसर्गिक कलेने नुकतीच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली भारताची बॉक्सर निकहत जरीन हिचे नाव व सोबत बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन अश्या पाच शब्दांपासून तिचे चक्क पोट्रेट तयार केले. त्यांची ही कलाकुसर पाहून मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी त्यांच्याकडून याबद्दल माहिती घेतली असता सय्यद खमर यांनी सांगितले की, मी माझे मोठे बंधू तथा शाह आर्ट्सचे संस्थापक सय्यद शहिंशाह यांच्या सोबत राहून पेंटिंग मधील अनेक बारकावे आत्मसात केले आणि आता गेल्या काही वर्षांपासून स्वतःचे स्वतंत्र काम करू लागलो. पेंटिंग मध्ये आतापर्यंत अनेकदा वेगवेगळे प्रयोग करून अनेक कामे केली आहे. करतोय व यापुढेही करत राहणार आहे. शिवाय लहान मुला-मुलींना पेंटिंग सोबतच हँडीक्राफ्ट चे शिक्षण देऊन नवनवीन कलाकार घडविण्याचे कार्यही सुरू आहे. याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सगळे सुरू असताना नुकतेच निकहत जरीन ही बॉक्सिंग मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरली व सुवर्णपदक पटकावले म्हणून तिच्यासाठी आपल्या हातून काहीतरी करावं म्हणून

नियोजन समिती निधीत मनमानी कारभार करणा-या निष्क्रिय पालकमंत्री बीड अतुल सावे यांना पदावरून हटवा

 सहकारमंत्री महाराष्ट्र राज्य तथा बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुलजी सावे यांचे बीड जिल्ह्य़ाकडे दुर्लक्ष असुन जिल्हा नियोजन समिती निधी २९८ कोटी वाटपात दिरंगाई तसेच भेदभाव आणि आर्थिक गैरव्यवहारासाठी आय पास न थेट प्रशासकीय मान्यता आदि.  मनमानी कारभार आदि कारणामुळे बीड जिल्ह्य़ाचे नुकसान होत असून त्यांना पदावरून हटवण्यात येऊन बीड जिल्ह्य़ातील नेत्याची पालकमंत्री बीड पदी नियुक्ती करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर ,मिलिंद सरपते यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव यांना निवेदन दिले असून आंदोलनाचा ईशारा दिला आहे.  सविस्तर माहीतीस्तव  ___ सहकारमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड ना. अतुलजी सावे यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हापरिषद व जिल्ह्यातील नगरपालिकांवर प्रशासक असुन प्रशासनावर मजबूत पकड नसल्यामुळेच जिल्ह्यातील प्रशासकीय आधिकारी मुजोर झाले असून मनमानी कारभार करत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असून संबधित प्रकरणात वारंवार पुराव्यासह तक्

आमदार शिरसाट यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - सुषमा अंधारे

Image
बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे आमदार संजय शिरसाट यांनी माझ्यावर टीका करतांना जी आर्वाच्य भाषा वापरली, माझी बदनामी केली या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परळीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. याशिवाय परळी पोलिसांत देखील त्यांच्याविरुद्ध बदनामी केल्याप्रकरणी तक्रार देण्यास सुषमा अंधारे गेल्या मात्र पोलीसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला.         शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या  पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ती करत असतांना लफडेबाज असा उल्लेख केल्यामुळे शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, परळी दौऱ्यावर असलेल्या अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केले. अंधारे म्हणाल्या, आमदार संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. परळी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याबदल तक्रार दाखल करण्यासाठी त्या गेल्या मात्र पोलीसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर ब

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला एस.एम.युसूफ़ यांचा अभिनंदनपर सत्कार

Image
बीड (प्रतिनिधी ) - जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा सोमवार दिनांक २७ मार्च २०२३ रोजी अभिनंदनपर हृदयी सत्कार केला. यावेळी चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा पद्मपाणि प्रतिष्ठानचे सदस्य हौसराव पवार, पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव तरकसे, आदर्श तरकसे आणि शेख वासेख यांची प्रमुख उपस्थिती होती. नुकतेच दिनांक ५ मार्च २०२३ रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या पद्मपाणि प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये चांगल्या व प्रामाणिक पत्रकारितेसाठी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना पत्रकारांचा पारंपारिक पोशाख शाल, कुर्ता, पायजमा आणि कोल्हापुरी चप्पल देऊन सन्मानित करण्यात आले होते. या मानाच्या सत्कारा प्रित्यर्थ मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कार्यालयात बोलावून पुष्पगुच्छ देत अभिनंदनपर हृदयी सत्कार केले. यावेळी हौसराव पवार सर, दिलीपराव तरकसे सर, आदर्श तरकसे आणि शेख वासेख यांची उपस्थिती होती.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागांच्या योजनांचा जागर

Image
सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )         जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती उपायोजना जनजागृती कार्यक्रम 2022 /23 लोककलेच्या माध्यमातून गावा गावात चालू‌           छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लोकशाहीर प्रताप होनाजी जाधव . प्रवीण जाधव जामवंत इंगळे वैभव चव्हाण मनोहर चव्हाण पंडित जाधव प्रणिमा जाधव महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क कार्यालय या जनजागृती कार्यक्रम सावळदबारा येथे चक्रधर स्वामी मंदिर समोर पार पडला संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात गावागावात कलावंतांनी परिणामकारक कार्यक्रमाची सादरीकरण करून लोकांची मने जिंकली लोकशाहीर प्रताप जाधव प्रवीण जाधव या पथकातील कलावंताचे जनजागरण करणारी कार्यक्रम लोकांमध्ये जागृती व जनसंपर्क करीत आहे शिवशाहीर प्रवीण जाधव प्रताप जाधव यांच्या कलापथक व मनोरंजनातून येथा योग्य संदेश देणे हे या लोककलांचे वशिष्य आहे हाच हेतू समोर ठेवून जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जागर करण्यात येत आह

सोयगावच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून चुकते माफ देण्याचा माझा प्रयत्न असेल पालकमंत्री संदिपान भुमरे

Image
सोयगावच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून चुकते माफ देण्याचा माझा प्रयत्न असेल पालकमंत्री संदिपान भुमरे  सोयगाव तालुका दुर्गम असल्याने तालुक्यात जनसुविधा व विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे असे स्पष्ट करीत सोयगावच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न असेल असे प्रतिपादन रोहयो तथा पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी सोयगाव येथे व्यक्त केले.  सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )       मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर, शेततळे व गरज तेथे पानंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. भुमरे यांनी केले.    सोयगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार होते. आज मंगळवार ( दि.28 ) रोजी शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.        यावेळी व्यासपीठावर रोहयोचे अप्पर मुख्य सचिव श्री. नंद

सोयगाव देव्हारी तांडा येथे एका गरीब शेतकरी मजुराचा मुलाचा महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड

Image
सोयगाव  देव्हारी तांडा येथे एका गरीब शेतकरी मजुराचा मुलाचा महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड   सोयगाव (प्रतिनिधी यासीन बेग ) देहावरी  तांडा येथील         आकाश प्रेम सिंग राठोड एक गरीब शेतकऱ्यांचा कर्तबगार मुलगा म्हणून ओळख यांची महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड झाल्याबद्दल गावातील जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्या आहे            सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील एक् गरीब शेतकर्‍याचा मुलगा आकाश राठोड   महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड   झाली यांचा जन्म देव्हारी येथील   लहानशा खेड्यात झाला. त्यांचे वडील प्रेमसिंग  राठोड , हे या गावात दोन एकरपेक्षाही लहान जमिनीत ज्वारीची शेती करतात देव्हारी गावातील  एका गरीब शेतकर्‍याची मुलगा  यांचा हा प्रवास स्फूर्तिदायक आहे. खरं तर, आकाश यांच्या महाराष्ट्र सुरक्षा बल होण्याचं बीज वडिलांच्या याच लहानशा शेतीत रोवलं गेलं. याविषयी आकाश राठोड  सांगतात, देव्हारी हे गाव“सोयगाव तालुक्याहून 70 किलोमीटर अंतरावर आहे या गावात बंजारा समाज बांधव जास्त प्रमाणात असतात या गावची लोकसंख्या जेमतेम दोन ते तीन हजार पर्यंत आहे आकाश राठोड हा तरुण मजुरी व शेती करून शिकला शेती

बीडमध्ये रात्री उपोषणकर्त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न

Image
बीडमध्ये रात्री उपोषणकर्त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न  माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर रात्री घडलेला प्रकार; उपोषणकर्त्याच्या सावधगिरीमुळे वाचला जीव  बीड प्रतिनिधी : येथील शिवाजी चौकातील कन्या शाळेसमोर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या चरणदास वाघमारे नामक उपोषणकर्त्याला रात्री झोपेत जाळून टाकण्याची खळबळजनक घटना घडली आहे. उपोषणकर्त्याच्या सावधगिरीमुळे वाचला जीव  असून दोन दिवसापासून सुरु असलेल्या उपोषण ठिकाणी एकही पोलिस फिरकला नाही. दरम्यान शिक्षणाधिकारी शिंदे या प्रकरणाची माहिती विचारली असता त्यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.  उपोषणकर्ते चरणदास वाघमारे हे कै. सुभद्राबाई मा. विद्यालय तागडगाव ता. शिरूर कासार येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पगार होत नसल्यामुळे पगार व्हावी या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. बीड शहरातील शिवाजी चौकातील कन्या शाळेसमोर, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या कार्यालयाच्या विरोधात ते न्याय मागण्यासाठी कालपासून उपोषणाला बसले आहेत. चरणदास वाघमारे हे रात्री १

जलसंधारण ही गावच्या सर्वांगीण विकासाची गुरुकुल्ली, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

Image
केतुरा होणार आदर्श गाव व जलसमृद्ध, सरपंच परमेश्वर नाना तळेकर बीड प्रतिनिधी अंकुश गवळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवल्यास प्रत्येक गाव जलसमृद्ध होईल, यासाठी पाणी आडवा ,पाणी जिरवा अभियान राबून जलसंधारणाचे कामे करावी, ज्या गावात जलसंधारणाची कामे होती ती गावे  सार्वजनिक आदर्श गावी असतील ,असे मत बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांनी मांडले, आज केतूरा नाम फाउंडेशन मार्फत जलसंधारणाचे कामे करण्यासाठी मोफत  मशीन उपलब्ध करून दिले, त्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी मॅडम बोलत होत्या यावेळी तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक श्री मिसाळ, आदर्श के तुरा ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच  श्री परमेश्वर नाना तळेकर, ऊपसरपंच वसंत शिरसट सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच दिलीप आहेर, नाम फाउंडेशनचे राजेभाऊ शेळके,  पाणी फाउंडेशनचे सिद्धेश्वर मेघने, लोकपत्रकार भागवत तावरे व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी केतुरा ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच परमेश्वर ना

गेवराई येथील गारवा हॉटेल या ठिकाणी बहुजन रयत परिषदची बैठक संपन्न

Image
 गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहेकर : गेवराई तालुक्यातील बहुजन रयत परिषद च्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन रयत परिषदचे मराठवाडा अध्यक्ष माननीय श्री अशोक बाप्पा सोनवणे हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष गोरख भाऊ मोमीन बीड तालुका अध्यक्ष रवी शिरसागर व रमेश लांडगे तसेच गेवराई तालुका अध्यक्ष धुरंधरे महेश बाप्पा तालुका उपाध्यक्ष प्रदीप राव उमाप तालुका सचिव योगीराज अण्णा साळवे इत्यादी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते यावेळी गेवराई येथे बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य गेवराई शहर उपाध्यक्ष माननीय आनंद विश्वनाथ सुतार शहर सचिव प्रवीण तात्यासाहेब चोतमल तसेच अचानक नगर येथे बहुजन रयत परिषदेची शाखा क्रमांक एक चे अध्यक्षपदी रामेश्वर विश्वनाथ पिंगळे उपाध्यक्षपदी प्रशांत गौरव जाधव सचिव पदी विशाल शिवाजी हातागळे यांचा सत्कार करून यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते किरण जाधव रोहित सराटे महादेव खरात सोमनाथ पवार अमोल घोरपडे अविनाश सुतार तात्यासाहेब चौथम

चर्मकार समाजाच्या मागण्या विधानभवनात मांडाव्यात यासाठी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना निवेदन

Image
चर्मकार समाजाच्या मागण्या विधानभवनात मांडाव्यात यासाठी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना निवेदन संत रविदास प्रतिष्ठान चे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत आणि प्रभारी अध्यक्ष आप्पा सोनटक्के संत रविदास चर्मकार आणि चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करण्याची मागणी चर्मकार समाजाच्या वतीने विधानभवनात मांडावी यासाठी बीड चे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना संत रविदास प्रतिष्ठान च्या  वतीने निवेदन देण्यात आले...   या निवेदनात चर्मकार महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे,बीज भांडवल कर्ज उपलब्ध,महिला समृद्धी योजना यासह महामंडळाच्या विविध योजना अंमलात येण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करावा ही मागणी विधानभवनात मांडावी अशी मागणीचे  निवेदन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांना बीड येथे संत रविदास प्रतिष्ठान चे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत ,प्रतिष्ठान चे प्रभारी अध्यक्ष आप्पा सोनटक्के,अनिल सातपुते,अरुणराव वाकुरे,दिलीप बनसोडे,सुनील माने,आशिष पवार,बप्पा  माने,गणेश तावरे,अंगद कांबळे यासह प्रतिष्ठान चे पदाधिकारी व समाज बांधव यांनी केली आहे.

आरटीई प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस१ हजार ८२७ जागांसाठी तब्बल ७ हजार ७४२ अर्ज

Image
आरटीई प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस १ हजार ८२७ जागांसाठी तब्बल ७ हजार ७४२ अर्ज शाळा पैसे मागत असतील तर तक्रार द्या - मनोज जाधव एकूण जागेच्या चौपट अर्ज आल्याने पालकांची चिंता वाढली पुणे लॉटरी पद्धतीने सोडत करून होणार प्रवेश निश्चित बीड (प्रतिनिधी ) शाळांमध्ये आरटीईच्या माध्यमातून मोफत प्रवेश दिला जातो. बीड जिल्ह्यात यावर्षी २२५ शाळा अॅडमीशनसाठी सज्ज आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सात हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. यावर्षी २२५ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळतील. या शाळात १ हजार ८२७ जांगावर प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी ७ हजार ७४२ इतके अर्ज आले आहेत. एकूण जागेच्या चौपट अर्ज आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.                 आरटीई प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ही पुणे येथून होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे ही प्रक्रिया होत आहे. २५ मार्च रोजी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती . त्यानंतर लॉटरी पद्धतीने पुणे येथे सोडत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत तसेच कागदपत्र तपसणी

कष्टातुन संसार फुलवणारी माता-कै.गं.भा.जिजाबाई नथुजी गाढवे

Image
कष्टातुन संसार फुलवणारी माता-कै.गं.भा.जिजाबाई नथुजी गाढवे     ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन ) -     - पदरात एक नाही, दोन नाही तर सात लेकरं. पतीचे अकाली निधन आणि संसाराची सर्व जबाबदारी अंगावर.अशा परिस्थितीतही न डगमगता कष्टाने मुला बाळाचां संसार फुलवणार्या धामणगाव, ता.ईगतपुरी येथील मातोश्री गं.भा.जिजाबाई नथुजी गाढवे यांचे नुकतेच वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.    अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गरिबीतुन मातोश्री गं भा जिजाबाईंनी आपला संसार फुलवला. पतीचे अकाली निधन‌ झालेले आणि पदरात चार मुली आणि तीन मुलं असा पोरवडा असतानांही न डगमगता जिजाबाईंनी संसार पेलला. सातही मुला-मुलीचें संगोपन,शिक्षण व त्यांची सुस्थळी लग्ने लावुन दिली.     आज त्यांच्या मुलानीं विविध व्यवसायात उतरत चौफेर प्रगती केली. राजेंद्र हा ट्रान्सपोर्ट व्यवसायासह वीटभट्टी व जेसीबी सांभाळत आहे.तर लहान मुलगा नवनाथ हा हाटेल व्यवसायासह कुक्कुटपालन व्यवसाय ही करत आहे.या शिवाय उत्तम रितीने ते शेतीही करत आहे.मोठा मुलगा रामदास हा शासकीय नौकरीस आहे तर मुलीही शेतकरी, शासकीय नौकरदार यांना दिले

डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रगतीसाठीडिजिटल मीडिया परिषद खंबीरपणे काम करेल -- अनिल वाघमारे

Image
डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रगतीसाठी डिजिटल मीडिया परिषद खंबीरपणे काम करेल -- अनिल वाघमारे जनजागृतीसाठी डिजिटल मीडियाची भूमिका महत्त्वाची - दिनकर शिंदे राज्यस्तरीय मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहा -- जितेंद्र सिरसाट बीड प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे   अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेली डिजिटल मीडिया परिषद ही संस्था डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान आणि प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केला. तर येणाऱ्या काळात जनजागृतीसाठी प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले. कर्जत येथे होणाऱ्या अ भा मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट यांनी केले आहे.        कर्जत जिल्हा अहमदनगर येथे दि 7 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय मेळावा आणि पत्रकार संघ प

सोन्याचे होलसेल व्यापारी नितीन उदावंत यांच्या मृत्यू प्रकरणी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Image
सोन्याचे होलसेल व्यापारी नितीन उदावंत यांच्या मृत्यू प्रकरणी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल  दोन लाखांचे सोने घेऊन पैसे देण्यास नकार; पैसे मागितले असता शिवीगाळ करत दमदाटी करून पाजले होते विष  गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील अहिल्यानगर येथील नितीन उदावंत हे गेल्या तीन वर्षांपासून वाघोली ता.जि. पुणे येथे राहुन सोन्याचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. राजीव गोल्ड नावाचे घरीच असणाऱ्या दुकानातून नितीन उदावंत हे सोन्याचे होलसेलचा व्यापार करत होते.  सविस्तर माहिती अशी की, नितीन उदावंत यांनी ओम छगनराव टाक व प्रशांत छगनराव टाक (रा. दोघे पाथर्डी,जि. अहमदनगर) यांना निलेश सुधाकर माळवे (रा.गेवराई ता.गेवराई जि.बीड) यांच्या मध्यस्थीने सुमारे दोन लाखांचे सोने विक्री केले होते. त्यांची उधारी बाकी असून त्यांना उधारी मागितली असता आज देतो उद्या देतो असे मागील काही महिन्यांपासून म्हणत असून बाकी असलेली दोन लाख रुपये उधारी देत नव्हते. तसेच नितीन उदावंत यांनी पैशाची मागणी केल्याच्यानंतर ते नेहमी नितीन उदावंत यांना शिवीगाळ करून धमकी देत होते‌ की,

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन ठाणे प्रतिनिधी :- भारतीय संविधानाचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३२ व्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे (मराठी / हिंदी/ इंग्रजी कोणत्याही भाषेत) आयोजक श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर यांनी केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, जशी नाचून साजरी करतो, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे लिखीत साहित्याचा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे. हा उद्देश आहे. निबंध लेखन स्पर्धेचे विषय :-  गट अ (वय : 15 ते 25 वर्ष) 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरणांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 2. लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 3. आज डॉ. आंबेडकर असते तर...? 4. बाबासाहेब यांनी काढलेल्या वृत्त पत्राचा आढावा गट ब (वय : 26 वर्ष + ) :- 1. वर्तमानात आंबेडकरवादी आंदोलना समोरची आव्हाने व त्याचे समाधान 2. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय आंबेडकरवादी संघटना य

संदिपान भुमरे राज्यमंत्री योहीयो व फलोत्पादन मंगळवारी सोयगाव शहरात...

Image
संदिपान भुमरे राज्यमंत्री योहीयो व फलोत्पादन मंगळवारी सोयगाव शहरात... महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमला बजावणी अनुषंगाने भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक...  सोयगाव प्रतिनिधी          संदिपान भुमरे पालकमंत्री तथा राज्यमंत्री योहीयो व फलोत्पादन मंगळवारी सोयगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने व फलोत्पादन महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे दुपारी १२ वा. आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस अ.सत्तार राज्याचे कृषी मंत्री आणि रोहीयो अप्पर मुख्य सचिव हे सुध्दा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सोयगाव तालुका शासनाने डोंगराळ म्हणून जाहीर केलेला आहे,मात्र तालुक्यातील बोरोगारीची वाढती समस्या प्राधान्याने सोडवत नाहीत. तालुका शेती प्रधान असून तालुक्यातील शेती सुपीक होण्यासाठी नव्याने पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम हाती घेण्याची नितांत गरज आहे , तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने, हंगामी शेती व्यवसायानंतर शेतकरी शेतमजुरांना , युवकांना हाताला काम मिळत नसल्याने दरवर्षी जिकडे मंजुरीसाठी परराज्

सोयगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी.जयंतीची कार्यकारिणी घोषित,अध्यक्षपदी रविंद्र काळें यांची निवड

Image
सोयगाव प्रतिनिधी मुश्ताक शाह          डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे बौद्ध धम्म उपासक आणि उपासीकाची महत्व पुर्ण बैठक नुकतीच पार पडली त्यात एक मताने अध्यक्ष,उपाअध्यक्ष, व खजिनदार यांची निवड करण्यात आली आहे.   अध्यक्ष.रविंद्र काळे.राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहर अध्यक्ष,संदीप चौधरी शिवसेना समाजसेवक,अक्षय हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड नव तरूण बौद्ध मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत आणि सहमतीने ही निवड पार पडली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी.जयंती असल्याने येत्या १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून सर्व नवं तरुण बौद्ध मंडळासह सर्वच समाजाला उत्सुकता लागली आहे, तो दिवस डॉ.आबेडकर यांचा जन्मदिवस असल्याने आनंदाचा दिवस आहे.  उर्वरित सन्माणीय कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे भास्कर श्रीखंडे , गणेश पगारे ,सुनिल पगारे , राहुल श्रीखंडे , नितीन साळवे , नामदेव पगारे , भगवान वानखेडे , रमेश साळवे , अतूल पगारे , अंकुश पगारे , आनंद पगारे , मयुर पगारे , राहुल पगारे , हर्षल काळे , कलीम पठाण , उदय रावळकर , बौध्द उपासक उपासीका यावेळी मोठ

कापूस दरवाढीची प्रतीक्षा किती दिवस पाहणार शेतकरी...?

Image
कापूस दरवाढीची प्रतीक्षा किती दिवस पाहणार शेतकरी...?   पेरणीसाठी घेतलेले कर्ज- मुलांचे शिक्षण- लग्न समारंभासाठी लागणारा खर्च आणणार तरी कुठून..?   कापूस सोयाबीन दरामध्ये घट होत असल्याने शेतकरी, छोटे व्यापारी ही चिंतेत.....?   सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह               मागिल सहा महिन्या पासून कापूस सोयाबीनचे दर प्रचंड प्रमाणात घसरलेले आहेत.मागच्या वर्षी दहा हजाराच्या पुढे कापूस तर सोयाबीनचे दर ७ हजार च्या आस पास होते शेतकऱ्याला गतवर्षीच्या भावाची अपेक्षा असतांना या वर्षी मात्र प्रत्यक्षात सोयाबीन ५ हजार तर कापूस सात हजाराच्या प्रति क्विंटल आसपास प्रमाणात दर स्थिर आहेत.यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीची प्रतीक्षा करायची किती दिवस हा प्रश्न उद्भवत आहे ?. शेतकऱ्याच्या पत्र्याच्या घरामधील सोयाबीन, कापसाचे वजन मोठ्या प्रमाणावर घसरत आहे तर पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेली कर्ज तर मुलांचे शिक्षण मुलाबाळाचे लग्न समारंभ पार पाडणार कसे .? या चिंतेमध्ये शेतकरी त्रस्त झाला आहे या भाववाढीच्या मानसिक दृष्ट्या त्रस्त झालेला घरातील करता माणूस पाहून सर्वच कुटुंब आर्थिक मानसिकताणामध्ये जगत आहे. सोय

रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली

Image
सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान...! सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह            गुरूवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने इस्लामी कालगणनेतील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुस्लीम बांधवांचा पहिला रोजा पार पडला. रमजानचा रोजा सोडतांना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुरांच्या विक्रीत वाढ होते,वाढत्या मागणीमुळे यंदा रमजान सुरु होताच खजुरांची मागणीही वाढली आहे. बाजारात मध्य पूर्वेच्या देशांमधून येणाऱ्या खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर २०० ते २,५०० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० ते २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय इराकमधील जाएदी खजुरालाही चांगली मागणी आहे. अजवा खजुराची किंमत सध्या १,००० ते १,५०० रुपये किलो आहे. तीदेखील १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. या शिवाय कलमी, ओमानी, मस्कती खजूर असे पर्याय उपलब्ध आहेत. खजुरांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर ६०० ग्रॅमसाठी १२० ते १३० रुपय

भारतचे संविधान व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज वसंत मुंडे

Image
परळी (प्रतिनिधी ) देशामध्ये गेल्या नऊ वर्षापासून विविध शासकीय योजनेमध्ये खाजगीकरण करून अनेक प्रकरणात देशातील शेतकरी शेतमजूर जवान कर्मचारी कामगार युवक वर्ग महिला न्याय हक्कापासून वंचित ठेवून ठराविक मित्र कंपनीला फायदा देऊन टॅक्स च्या रूपात प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे केला .राहुल गांधीच्या विषयावर ओबीसी च्या नावाने केंद्र सरकार राजकारण करीत आहे . पण जात निहाय जनगणना का जाहीर केली नाही .ओबीसीचा इम्पिरियल डाटा का दिला नाही ,ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय का नाही , एससी एसटी प्रमाणे स्वतंत्र बजेटची तरतूद का केली जात नाही, ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत राजकीय आरक्षण ओबीसीला का दिले गेले नाही या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसीच्या जनतेला देण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली. राहुल गांधी परदेशात जाऊन विरोधात वक्तव्य करतात अशा आरोप केला जातो तर चीन कोरिया अमेरिका या देशात भारताच्या पंतप्रधान आणि जाऊन अनेक विरोधात भाषणे केलेले आहेत त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार हिंडनबर्ग या संस्थेने आदानी उ

रविवार असुन सुद्धा तहसीलदार सुहास हजारेंनी वस्तीवरील ग्रामस्थांची रस्त्याची अडचण सोडवली:- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड तालुक्यातील मौजे.सोमनाथवाडी येथील काही ग्रामस्थांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने वहित पाणंद रस्ता खोदून ठेवल्यामुळे कदमवस्ती, दाभाडे,जाधववस्ती,तावरे, इंगोले, शेळके आदी.२०० पेक्षा जास्त ग्रामस्थांना वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार बीड सुहास हजारे यांना फोनवरून कल्पना देत तसेच खोदलेल्या रस्त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवुन रस्ता खुला करून देण्यात यावा अशी विनंती केली होती.विनंतीला मान देऊन दुपारी तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी वंजारे, तलाठी कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पंचनामा करत रस्ता खोदणाराला नोटीस देण्याचे आदेश मंडळ अधिकारी, तलाठी यांना देऊन नेकनुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.व जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदलेला रस्ता पुर्ववत करून वस्तीकरांसाठी खुला करून देण्यात आला यावेळी डॉ.गणेश ढवळे, उपसरपंच किशोर शेळके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.   तलावातील गाळ काढण्यास अडवल्यामुळे रस्ता जेसीबीने खोदला होता गेल्या कित्येक वर्षांपासून वहिवाट असलेला व

आम आदमी पार्टीचे गावागावात जाऊन रुमण मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांना आव्हान

Image
आम आदमी पार्टीचे गावागावात जाऊन रुमण मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांना आव्हान  शेतकरी मित्रांनो मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने रुमण घेऊन सहभागी व्हा-माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी  बीड प्रतिनिधी :-आम आदमी पार्टीच्या वतीने बीड जिल्ह्य मध्ये अवकाळी गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे . शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अद्याप कसल्याही प्रकारची शासनाच्या वतीने दखल घेण्यात आलेली नाही . शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे हाता तोंडाला आलेले पीक फळबागे ,आंबा, संत्रा ,अंगूर ,खरबूज ,चिंच, गहू, जवारी ,हरभरा यासारख्या पिकांचे नुकसान झालेले असताना देखील कसल्याही प्रकारचा एकही पंचनामा बीड जिल्ह्या मध्ये झालेला नाही . आपण आपली यंत्रणा कामाला लावून तात्काळ पंचनामे करून घ्यावे शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचावी महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन जो महाराष्ट्रातील जनतेवरती वाढीव वीजदर लागू केला आहे , तो महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा शेतकऱ्यांचे वाढलेले खताचे भाव कमी करण्यात यावेत शेतमालाला भाव कसलाही नसताना फक्त आणि फक

तलावातील गाळ नेण्यास गावठाणाने अडवले , वस्तीकरांचा रस्ताच जेसीबीने

Image
गावच्या राजकारणात वस्तीकरांची जिरली........ तलावातील गाळ नेण्यास गावठाणाने अडवले , वस्तीकरांचा रस्ताच जेसीबीने खोदला  मौजे.सोमनाथवाडी ता.जि.बीड येथील गावठाणातील ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसून नेण्यास आडकाठी घातल्यामुळे शेतक-याने जेसीबी यंत्राने रस्ता खोदून कदम,जाधव, दाभाडे,तावरे, इंगोले, शेळके वस्तीवरील ग्रामस्थांची रहदारीच बंद केल्याचा प्रकार घडला आहे. बीड तालुक्यातील मौजे.सोमनाथवाडी गावाच्या पुर्वेस कदमवस्ती, दाभाडे,जाधववस्ती,तावरे, इंगोले, शेळके आदी.२०० लोकांचा रहदारीचा पाणंद रस्ता असून काल रात्री सखाराम इंगोले, गणेश इंगोले, विक्रम इंगोले यांनी जेसीबीच्या सहाय्याने उकरून रस्ता बंद केला असून ग्रामस्थांना वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे. तलावातील गाळ न्यायला विरोध केला म्हणून रस्ता खोदला :- इंगोले बंधु सध्याचा रस्ता पुर्णपणे आमच्या मालकी हक्काच्या शेतातुन जात असुन गेल्यावर्षी पुल बांधताना ग्रास्थांच्या विनंतीवरून रस्ता मुळ ठिकाणी करण्याच्या अटीवर आम्ही पुल बांधून दिला.परंतु सत्ताधारी आम्हालाच तलावातील गाळ नेण्यास आडकाठी करत असतील तर आम्ही आमच्या मालकी हक्काच्या शेतातून का

वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार बालाजी काळे

Image
बीड प्रतिनिधी. अंकुश गवळी राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक बीड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली ,यावेळी या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सचिव आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती, यावेळी या बैठकीमध्ये प्रास्ताविक राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी आपले प्रास्ताविक केले व येणाऱ्या बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद रासप बीड जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढवणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी केले. बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेळके माऊली सलगर महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव शिवाजी शेंडगे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विष्णू गोरे मराठवाडा अध्यक्ष महेश चौरे सर जिल्हा संपर्कप्रमुख मतकर अण्णासाहेब जिल्हाध्यक्ष कल्याण गवते जिल्हाध्यक्ष भगवान माने कर्मचारी जिल्हाध्यक्ष विक्रम सोनसळे लोकसभा अध्यक्ष माऊली मार्कड विधानसभा अध्यक्ष शिवाजी चांगन सरचिटणीस जिल्हा डॉक्टर तांबे जिल्हा सचिव काशीद परशुराम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार उंबरे येळे सर सामाजिक कार्यकर्ते शिवराम शिरगिरे युवा न