संदिपान भुमरे राज्यमंत्री योहीयो व फलोत्पादन मंगळवारी सोयगाव शहरात...
संदिपान भुमरे राज्यमंत्री योहीयो व फलोत्पादन मंगळवारी सोयगाव शहरात...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमला बजावणी अनुषंगाने भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक...
सोयगाव प्रतिनिधी
संदिपान भुमरे पालकमंत्री तथा राज्यमंत्री योहीयो व फलोत्पादन मंगळवारी सोयगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने व फलोत्पादन महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे दुपारी १२ वा. आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस अ.सत्तार राज्याचे कृषी मंत्री आणि रोहीयो अप्पर मुख्य सचिव हे सुध्दा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सोयगाव तालुका शासनाने डोंगराळ म्हणून जाहीर केलेला आहे,मात्र तालुक्यातील बोरोगारीची वाढती समस्या प्राधान्याने सोडवत नाहीत. तालुका शेती प्रधान असून तालुक्यातील शेती सुपीक होण्यासाठी नव्याने पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम हाती घेण्याची नितांत गरज आहे , तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने, हंगामी शेती व्यवसायानंतर शेतकरी शेतमजुरांना , युवकांना हाताला काम मिळत नसल्याने दरवर्षी जिकडे मंजुरीसाठी परराज्यात स्थलांतर करून ऊसतोड,ईटभट्टी सारख्या काम करुन आपले व आपल्या कुटुंबा समवेत जावे लागते, जानेवारी महिन्या पासून ऊन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे सोयगाव तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लघु पाटबंधारे, मृद संधारण, पंचायत समिती आदी कार्यालयाअंतर्गत अद्याप एकही काम हाती घेत सुरू केले नसल्याने हातमजुरीवर पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार सैरवैर झालेला आहे. तालुक्यांतील बेरोजगारांना कायम स्वरूपी रोजगार मिळावा करीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंत्र्यांकडून जनता अपेक्षा व्यक्त करित आहे.
एरव्ही सतत कामात हयगय करुन गैरहजर राहणाऱ्या शासकिय अधिकारी व कर्मचारी राज्यमंत्र्याचाऱ्यांच्या दौऱ्यांच्या अनुषंगाने कार्यालयातील लागनारी महीती अध्यावत करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी सुध्दा कार्यालयात दिसून आले.
Comments
Post a Comment