बीडमध्ये रात्री उपोषणकर्त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न
बीडमध्ये रात्री उपोषणकर्त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर रात्री घडलेला प्रकार; उपोषणकर्त्याच्या सावधगिरीमुळे वाचला जीव
बीड प्रतिनिधी : येथील शिवाजी चौकातील कन्या शाळेसमोर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या चरणदास वाघमारे नामक उपोषणकर्त्याला रात्री झोपेत जाळून टाकण्याची खळबळजनक घटना घडली आहे. उपोषणकर्त्याच्या सावधगिरीमुळे वाचला जीव
असून दोन दिवसापासून सुरु असलेल्या उपोषण ठिकाणी एकही पोलिस फिरकला नाही. दरम्यान शिक्षणाधिकारी शिंदे या प्रकरणाची माहिती विचारली असता त्यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणकर्ते चरणदास वाघमारे हे कै. सुभद्राबाई मा. विद्यालय तागडगाव ता. शिरूर कासार येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पगार होत नसल्यामुळे पगार व्हावी या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. बीड शहरातील शिवाजी चौकातील कन्या शाळेसमोर, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या कार्यालयाच्या विरोधात ते न्याय मागण्यासाठी कालपासून उपोषणाला बसले आहेत. चरणदास वाघमारे हे रात्री १२ च्या सुमारास झोपेत असतांना त्यांच्या उशीला आग लागल्याचे लक्षात आहे. उशीवर डोके ठेऊन झोपल्यामुळे डोक्याला गरम लागताच ते सावध झाले. हा प्रकार लक्षात येताच कुणीतरी मुद्दामहून के कृत्य केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उपोषणकर्त्याला रात्री झोपेत जाळून टाकण्याच्या या खळबळजनक घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उपोषणकर्त्याच्या सावधगिरीमुळे वाचला जीव असून दोन दिवसापासून सुरु असलेल्या उपोषण ठिकाणी अद्याप पोलिस आले नसल्याची माहिती आहे.
Comments
Post a Comment