वंचित बहुजन आघाडीच्या महत्वपूर्ण बैठकीत उपस्थित रहा किशोर भोले


बीड प्रतिनिधी :-सखाराम पोहेकर गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी दिनांक दोन एप्रिल 2023 रोजी गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथेदुपारी ठीक बारा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीस उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी असे आव्हान केले या बैठकीमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या गेवराई तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्व तयारी संदर्भात गेवराई तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सर्कल प्रमुख गन प्रमुख गेवराई शहरातील बूथ प्रमुख यांच्या संघटनात्मक बांधणीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या मराठा धनगर माळी व बंजारा समाजातील नेत्यांचा पक्ष प्रवेश प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे यावर्षी तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे साहेब जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर साहेब यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासकीय विश्रामगृह गेवराई येथे दिनांक 2/4/2023 रोजी ठीक बारा वाजता या बैठकीस उपस्थित राहावे असे आव्हान गेवराई तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे 

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी