डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन
ठाणे प्रतिनिधी :- भारतीय संविधानाचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३२ व्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धाचे (मराठी / हिंदी/ इंग्रजी कोणत्याही भाषेत) आयोजक श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर यांनी केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, जशी नाचून साजरी करतो, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे लिखीत साहित्याचा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे. हा उद्देश आहे. निबंध लेखन स्पर्धेचे विषय :-
 गट अ (वय : 15 ते 25 वर्ष)
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरणांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
2. लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. आज डॉ. आंबेडकर असते तर...?
4. बाबासाहेब यांनी काढलेल्या वृत्त पत्राचा आढावा
गट ब (वय : 26 वर्ष + ) :-
1. वर्तमानात आंबेडकरवादी आंदोलना समोरची आव्हाने व त्याचे समाधान
2. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय आंबेडकरवादी संघटना यांच्यात समन्वय कशा पद्धतीने साधता येऊ शकतो!
3. नवीन शैक्षणिक धोरणाचा बहुजन समाजावर होणारा परिणाम.
4. जातीनिहाय जनगणना याचे महत्त्व स्पष्ट करा
5. तरूणांना आंबेडकरी आंदोलनात सामील होण्याची गरज आणि त्याचे मार्ग.

      वरील विषयावर स्वलिखित शब्द मर्यादा: 2000 पर्यत 
आपले निंबध लेखन दिलेल्या लिंकवर 

 प्रथम- पारितोषिक : 4000/- + सर्टिफिकेट , द्वितीय- पारितोषिक : 2000/- + सर्टिफिकेट ,. तृतीय- पारितोषिक : 1000/- + सर्टिफिकेट . 3 उत्तेजनार्थ पारितोषिक 500 /- + सर्टिफिकेट सर्व स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात येतील.

(https://forms.gle/srSekgfLZVEzLewB6) ११ एप्रिल २०२३ रोजी ठिक रात्री नऊ वाजेपर्यंत पर्यंत पाठवायचे आहेत. आपण या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक, विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय राजनीती विषयाचे संशोधक डॉ. सुमेध पारधी, जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे, ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे, इजि. गौतम बस्ते यांनी केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी