निकहत जरीन बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन या पाच शब्दांनी साकारला पोट्रेट
बीड (प्रतिनिधी) - शहरातील शाह आर्ट्स चे सय्यद खमर यांनी आपल्यात असलेल्या नैसर्गिक कलेने नुकतीच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली भारताची बॉक्सर निकहत जरीन हिचे नाव व सोबत बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन अश्या पाच शब्दांपासून तिचे चक्क पोट्रेट तयार केले. त्यांची ही कलाकुसर पाहून मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी त्यांच्याकडून याबद्दल माहिती घेतली असता सय्यद खमर यांनी सांगितले की, मी माझे मोठे बंधू तथा शाह आर्ट्सचे संस्थापक सय्यद शहिंशाह यांच्या सोबत राहून पेंटिंग मधील अनेक बारकावे आत्मसात केले आणि आता गेल्या काही वर्षांपासून स्वतःचे स्वतंत्र काम करू लागलो. पेंटिंग मध्ये आतापर्यंत अनेकदा वेगवेगळे प्रयोग करून अनेक कामे केली आहे. करतोय व यापुढेही करत राहणार आहे. शिवाय लहान मुला-मुलींना पेंटिंग सोबतच हँडीक्राफ्ट चे शिक्षण देऊन नवनवीन कलाकार घडविण्याचे कार्यही सुरू आहे. याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सगळे सुरू असताना नुकतेच निकहत जरीन ही बॉक्सिंग मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरली व सुवर्णपदक पटकावले म्हणून तिच्यासाठी आपल्या हातून काहीतरी करावं म्हणून तिच्या नावासोबत बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन शब्द लिहून मी तिचा हा पोट्रेट तयार केला आहे. तिने आपल्या देशासाठी मिळविलेल्या यशाबद्दल एक भारतीय म्हणून तिचे आभार व्यक्त करायचे होते. शिवाय यातून उर्दू ही भाषा बोलायला व ऐकायला जशी गोड वाटते त्याची खासियत फक्त एवढीच नसून ती लिहितानाही अत्यंत लवचिकपणे लिहिता येते व कशाही आकारात लिहिले तरी ती वाचता येते हा संदेशही यातून दिला. असे मनोगत सय्यद खमर यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
Comments
Post a Comment