कष्टातुन संसार फुलवणारी माता-कै.गं.भा.जिजाबाई नथुजी गाढवे

कष्टातुन संसार फुलवणारी माता-कै.गं.भा.जिजाबाई नथुजी गाढवे
    ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन) -

    - पदरात एक नाही, दोन नाही तर सात लेकरं. पतीचे अकाली निधन आणि संसाराची सर्व जबाबदारी अंगावर.अशा परिस्थितीतही न डगमगता कष्टाने मुला बाळाचां संसार फुलवणार्या धामणगाव, ता.ईगतपुरी येथील मातोश्री गं.भा.जिजाबाई नथुजी गाढवे यांचे नुकतेच वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
   अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गरिबीतुन मातोश्री गं भा जिजाबाईंनी आपला संसार फुलवला. पतीचे अकाली निधन‌ झालेले आणि पदरात चार मुली आणि तीन मुलं असा पोरवडा असतानांही न डगमगता जिजाबाईंनी संसार पेलला. सातही मुला-मुलीचें संगोपन,शिक्षण व त्यांची सुस्थळी लग्ने लावुन दिली. 
   आज त्यांच्या मुलानीं विविध व्यवसायात उतरत चौफेर प्रगती केली. राजेंद्र हा ट्रान्सपोर्ट व्यवसायासह वीटभट्टी व जेसीबी सांभाळत आहे.तर लहान मुलगा नवनाथ हा हाटेल व्यवसायासह कुक्कुटपालन व्यवसाय ही करत आहे.या शिवाय उत्तम रितीने ते शेतीही करत आहे.मोठा मुलगा रामदास हा शासकीय नौकरीस आहे तर मुलीही शेतकरी, शासकीय नौकरदार यांना दिलेल्या आहेत. सौ.सुमनबाई रामदास पा. खातळे (कर्होळे, ता.ईगतपुरी) , सौ.मिराबाई शांताराम पा जाधव (समनेरे ता.ईगतपुरी) , सौ. लंकाबाई शिवाजी पा मांडे (घोटी, ता.ईगतपुरी) , सौ.ललिता मधुकर पा ढोकणे (शेवगेदारणा,ता.नाशिक)ही मुलीचीं नावे आहेत. या मुली स्वत:च आता आज्याही झालेल्या आहेत.
   आजमितीला जिजाबाई यांचे कुटुंब गावातच नव्हे तर पंचक्रोशीत आघाडीवर आहे.या शिवाय ते सामाजीक बांधिलकीही जोपासत आहे.
   मातोश्री गं भा जिजाबाईं यांच्या पश्चात् तीन मुले, चार मुली, सुना जाव ई , नातवंडासह पतवंडे आदि परिवार आहे. 
   त्यांचा दशक्रिया विधी शुक्रबार दि. ३१ मार्च २०२३ रोजी सर्व तीर्थ टाकेद येथे स.८ वा होणार आहे. या प्रसंगी ह भ प देवराम महाराज गायकवाड दौंड यांचे प्रवचन होणार आहे. 
   अशा या मातोश्री ला विनम्र भावाजंली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी