पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला एस.एम.युसूफ़ यांचा अभिनंदनपर सत्कार
बीड (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा सोमवार दिनांक २७ मार्च २०२३ रोजी अभिनंदनपर हृदयी सत्कार केला. यावेळी चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा पद्मपाणि प्रतिष्ठानचे सदस्य हौसराव पवार, पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव तरकसे, आदर्श तरकसे आणि शेख वासेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
नुकतेच दिनांक ५ मार्च २०२३ रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या पद्मपाणि प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये चांगल्या व प्रामाणिक पत्रकारितेसाठी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना पत्रकारांचा पारंपारिक पोशाख शाल, कुर्ता, पायजमा आणि कोल्हापुरी चप्पल देऊन सन्मानित करण्यात आले होते. या मानाच्या सत्कारा प्रित्यर्थ मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कार्यालयात बोलावून पुष्पगुच्छ देत अभिनंदनपर हृदयी सत्कार केले. यावेळी हौसराव पवार सर, दिलीपराव तरकसे सर, आदर्श तरकसे आणि शेख वासेख यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment