मुख्याधिकारी, प्रशासक यांच्यावर कारवाई करण्याची धमक जिल्हाधिकारी महोदयां दाखवतील का ? - भाई गौतम आगळे
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या मुलभूत अधिकारा पासून वंचित ठेवणारे बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व प्रशासक, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी महोदया दिपा मुधोळ - मुंडे करत असल्याचे दिसून येत आहे. असा गंभीर आरोप कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
कामगार कायदे, शासन परिपत्रक, शासन निर्णय, मा. न्यायालयाचे आदेश आणि तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे निर्देश सुध्दा मुख्याधिकारी, प्रशासक नगरपरिषद / नगरपंचायत बीड जिल्ह्यातील सर्वजण पाळत नाहीत हे सर्व सनदी अधिकारी असुन लोकसेवक आहेत. ते पद व अधिकाराचा गैर वापर करून घटनेचे कलम ४६ व ५२ चे उल्लंघन करत आहेत असे दिसून आले. भारतीय दंड संहितेच्या १२४ - अ देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो, तसेच मानसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी अनुच्छेद २३ या कलमा द्वारे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे लेखी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तशी धमक जिल्हाधिकारी बीड महोदया दिपा मुधोळ - मुंडे दाखवतील का ? असा खडा सवाल रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. सदर निवेदनाच्या प्रती संबंधित मंत्री व अधिकारी महोदय यांना ई - मेल द्वारे पाठविण्यात आल्या आहेत. मुलभूत न्याय मागण्या: किमान वेतन अधिनियम, १९४८ व नियम १९६२ नुसार खालील अभिलेख ठेवने बंधन कारक आहे. नियम १७ (१) मस्टर रोल तथा वेतन रजिस्टर ठेवने बंधन कारक, नियम २७ ( १ ) ( १ ) अ नुसार प्रत्येक महिना संपल्या नंतर ०७ तारखेच्या आत वेतन अदा करने बंधन कारक, मागिल चार महिन्यांपासून थकीत ठेवलेले वेतन अदा करावे, कलम ११(१) नुसार बॅंकेत वेतन जमा करणे बंधनकारक, नियम २७ (२) कामगारांना हजेरी वेतन कार्ड देणे बंधनकारक, नियम २३ नुसार साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ अंतर्गत कामगारांच्या नावावर पि.एफ.भरना करने बंधनकारक.
उपरोक्त मागण्या येत्या सात दिवसांत सोडविण्यात याव्यात अन्यथा १० एप्रिल २०२३ रोजी मा. विभागीय आयुक्त कार्यालय, छ. संभाजी नगर /औरंगाबाद. समोर संतप्त कंत्राटी कामगार टोकाची भूमिका घेतील अशी विनंती दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अशी माहिती एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना, केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर व मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment