जलसंधारण ही गावच्या सर्वांगीण विकासाची गुरुकुल्ली, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
केतुरा होणार आदर्श गाव व जलसमृद्ध, सरपंच परमेश्वर नाना तळेकर
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी
गावच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवल्यास प्रत्येक गाव जलसमृद्ध होईल, यासाठी पाणी आडवा ,पाणी जिरवा अभियान राबून जलसंधारणाचे कामे करावी, ज्या गावात जलसंधारणाची कामे होती ती गावे सार्वजनिक आदर्श गावी असतील ,असे मत बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांनी मांडले, आज केतूरा नाम फाउंडेशन मार्फत जलसंधारणाचे कामे करण्यासाठी मोफत मशीन उपलब्ध करून दिले, त्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी मॅडम बोलत होत्या यावेळी तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक श्री मिसाळ, आदर्श के तुरा ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच श्री परमेश्वर नाना तळेकर, ऊपसरपंच वसंत शिरसट सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच दिलीप आहेर, नाम फाउंडेशनचे राजेभाऊ शेळके, पाणी फाउंडेशनचे सिद्धेश्वर मेघने, लोकपत्रकार भागवत तावरे व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी केतुरा ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच परमेश्वर नाना तळेकर आपल्या भाषणात म्हणाले आहे की केतुरा गाव मी महाराष्ट्रात आदर्श गाव घडवणार असल्याचे प्रतिपादन सरपंच नाना यांनी केले आहे,
Comments
Post a Comment