सोयगाव देव्हारी तांडा येथे एका गरीब शेतकरी मजुराचा मुलाचा महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड
सोयगाव देव्हारी तांडा येथे एका गरीब शेतकरी मजुराचा मुलाचा महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड
सोयगाव (प्रतिनिधी यासीन बेग)
देहावरी तांडा येथील
आकाश प्रेम सिंग राठोड एक गरीब शेतकऱ्यांचा कर्तबगार मुलगा म्हणून ओळख यांची महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड झाल्याबद्दल गावातील जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्या आहे
सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील एक् गरीब शेतकर्याचा मुलगा आकाश राठोड महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड झाली यांचा जन्म देव्हारी येथील
लहानशा खेड्यात झाला. त्यांचे वडील प्रेमसिंग राठोड , हे या गावात दोन एकरपेक्षाही लहान जमिनीत ज्वारीची शेती करतात देव्हारी गावातील एका गरीब शेतकर्याची मुलगा यांचा हा प्रवास स्फूर्तिदायक आहे.
खरं तर, आकाश यांच्या महाराष्ट्र सुरक्षा बल होण्याचं बीज वडिलांच्या याच लहानशा शेतीत रोवलं गेलं. याविषयी आकाश राठोड सांगतात, देव्हारी हे गाव“सोयगाव तालुक्याहून 70 किलोमीटर अंतरावर आहे या गावात बंजारा समाज बांधव जास्त प्रमाणात असतात या गावची लोकसंख्या जेमतेम दोन ते तीन हजार पर्यंत आहे आकाश राठोड हा तरुण मजुरी व शेती करून शिकला शेती करताना बाबांना जमिनीसंबंधी अनेक अडचणी येत.होत्या मात्र या समस्या सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही त्यांना कधीच आपल्या मुलाला कधीच शेतीविषयी अडचण सांगितली नाही . बाबा आम्हाला सांगायचे की, शासकीय कार्यालयात कुणीतरी ‘आपला माणूस आसावा ’, जो मनात आणलं तर सारं काही ठीक करू शकतो. म्हणूनच आपल्या कुटुंबातून कुणीतरी महाराष्ट्र सुरक्षा बल व्हावं, असं त्यांना वाटायचं. आपल्या हक्काचं कुणी , तरी आपलं असावं कि ते आपल्याला मार्गदर्शन करेल अशी भावना त्यामागे होती.” वडिलांची ही इच्छा ३ भावंडांच्या कुटुंबातील १ अपत्य असलेल्या आकाश राठोड यांनी पूर्ण केल .
कोचिंगशिवाय झाल्या उत्तीर्ण
आकाश राठोड यांचं लग्न होऊन एक् मूलगा आहे
. ते आपल्या पत्नी विषयी सांगतात, कि माझी पत्नी घर काम आटपून शेती ची कामही करायची आम्ही सर्वजण घरातील सर्व कामं एकमेकांच्या सहकार्याने करतो. एक सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आकाश राठोड यांनी नियोजनबद्ध व परिश्रम घेत महाराष्ट्र सुरक्षा बल होण्याच स्वप्न साकार केला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पदीं निवड झाल्याबद्दल गावातील मित्रानी त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार पन करण्यात आला
.
Comments
Post a Comment