आरटीई प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस१ हजार ८२७ जागांसाठी तब्बल ७ हजार ७४२ अर्ज
आरटीई प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस
१ हजार ८२७ जागांसाठी तब्बल ७ हजार ७४२ अर्ज
शाळा पैसे मागत असतील तर तक्रार द्या - मनोज जाधव
एकूण जागेच्या चौपट अर्ज आल्याने पालकांची चिंता वाढली
पुणे लॉटरी पद्धतीने सोडत करून होणार प्रवेश निश्चित
बीड (प्रतिनिधी) शाळांमध्ये आरटीईच्या माध्यमातून मोफत प्रवेश दिला जातो. बीड जिल्ह्यात यावर्षी २२५ शाळा अॅडमीशनसाठी सज्ज आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सात हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. यावर्षी २२५ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळतील. या शाळात १ हजार ८२७ जांगावर प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी ७ हजार ७४२ इतके अर्ज आले आहेत. एकूण जागेच्या चौपट अर्ज आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
आरटीई प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ही पुणे येथून होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे ही प्रक्रिया होत आहे. २५ मार्च रोजी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती . त्यानंतर लॉटरी पद्धतीने पुणे येथे सोडत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत तसेच कागदपत्र तपसणी साठी तालुका निहाय गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पडताळनी समित्या गटित करण्यात येणार आहेत. तेव्हा पालकांना शाळेमध्ये प्रवेश वेळी होणाऱ्या नाहक त्रासा पासून सुटका मिळणार आहे. पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल.तरी देखील पालकांनी एसएमएस अवलंबून न रहता आपल्या पाल्याची मोफत प्रवेशासाठी निवड झाली की नाही याची पडताळणी करावी असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
अशी झाली नोंदणी
१) 'आरटीई' साठी नोंदणी केलेल्या शाळांची संख्या- २२५
२) प्रवेशासाठी उपलब्ध जागा- १ हजार ८२७
३) विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल संख्या- ७ हजार ७४२
शाळा पैसे मागत असतील तर तक्रार द्या - मनोज जाधव
मोफत प्रवेश घेतल्यानंतर शाळा कपडे, वही/पुस्तके, दप्तर, बुट , बस भडे याची रक्कम अकारू शकतात मात्र या व्यतिरिक्त कसलीही फी घेण्याची शाळांना परवानगी नाही. जर शाळा विविध कारणांनी पैसे घेत असतील तर पालकांनी आधी गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी , मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही शाळां विरोधात लेखी तक्रार करावी असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
तालुके - आरटीई पत्र - प्रवेशाच्या - दाखल झालेले
शाळांची संख्या. जागा. अर्ज.
अंबाजोगाई ३५ २१४ ११८९
आष्टी १४ ४६ १५९
बीड १७ १६९ १८७८
धारूर ०७ १०७ २२९
गेवराई ३६ २८५ ११८६
केज २१ २२९ ६०७
माजलगाव २९ १४७ ८८४
परळी २७ २६२ ११७१
पाटोदा ०४ १५ १०९
शिरूर ०९ ११५ २१३
बीड शहर १९ २५८ ८४
वडवनी ०७ ४६ १३३
एकूण. २२५ १८२७ ७७४२
Comments
Post a Comment