तलावातील गाळ नेण्यास गावठाणाने अडवले , वस्तीकरांचा रस्ताच जेसीबीने
गावच्या राजकारणात वस्तीकरांची जिरली........
तलावातील गाळ नेण्यास गावठाणाने अडवले , वस्तीकरांचा रस्ताच जेसीबीने खोदला
मौजे.सोमनाथवाडी ता.जि.बीड येथील गावठाणातील ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसून नेण्यास आडकाठी घातल्यामुळे शेतक-याने जेसीबी यंत्राने रस्ता खोदून कदम,जाधव, दाभाडे,तावरे, इंगोले, शेळके वस्तीवरील ग्रामस्थांची रहदारीच बंद केल्याचा प्रकार घडला आहे.
बीड तालुक्यातील मौजे.सोमनाथवाडी गावाच्या पुर्वेस कदमवस्ती, दाभाडे,जाधववस्ती,तावरे, इंगोले, शेळके आदी.२०० लोकांचा रहदारीचा पाणंद रस्ता असून काल रात्री सखाराम इंगोले, गणेश इंगोले, विक्रम इंगोले यांनी जेसीबीच्या सहाय्याने उकरून रस्ता बंद केला असून ग्रामस्थांना वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे.
तलावातील गाळ न्यायला विरोध केला म्हणून रस्ता खोदला :- इंगोले बंधु
सध्याचा रस्ता पुर्णपणे आमच्या मालकी हक्काच्या शेतातुन जात असुन गेल्यावर्षी पुल बांधताना ग्रास्थांच्या विनंतीवरून रस्ता मुळ ठिकाणी करण्याच्या अटीवर आम्ही पुल बांधून दिला.परंतु सत्ताधारी आम्हालाच तलावातील गाळ नेण्यास आडकाठी करत असतील तर आम्ही आमच्या मालकी हक्काच्या शेतातून का वाहतुक करून द्यावी याची जाण व्हावी म्हणून रस्ता खोदला.
तलावातील गाळ नेण्यास सर्वांनाच मुभा:- किशोर शेळके सरपंच
गातलावातील गाळ शेतात नेण्यास सर्वांनाच मुभा असुन ज्याला गाळ न्यायचा असेल त्यांनी घेऊन जाण्यास ग्रामपंचायतची कसलीही हरकत नाही.
तहसीलदार सुहास हजारे यांना तक्रार , प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार सुहास हजारे यांना फोनवरून कल्पना दिली असून रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे.सुहास हजारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
Comments
Post a Comment