चर्मकार समाजाच्या मागण्या विधानभवनात मांडाव्यात यासाठी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना निवेदन
चर्मकार समाजाच्या मागण्या विधानभवनात मांडाव्यात यासाठी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना निवेदन
संत रविदास प्रतिष्ठान चे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत आणि प्रभारी अध्यक्ष आप्पा सोनटक्के
संत रविदास चर्मकार आणि चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करण्याची मागणी चर्मकार समाजाच्या वतीने विधानभवनात मांडावी यासाठी बीड चे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना संत रविदास प्रतिष्ठान च्या वतीने निवेदन देण्यात आले...
या निवेदनात चर्मकार महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे,बीज भांडवल कर्ज उपलब्ध,महिला समृद्धी योजना यासह महामंडळाच्या विविध योजना अंमलात येण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करावा ही मागणी विधानभवनात मांडावी अशी मागणीचे निवेदन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांना बीड येथे संत रविदास प्रतिष्ठान चे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत ,प्रतिष्ठान चे प्रभारी अध्यक्ष आप्पा सोनटक्के,अनिल सातपुते,अरुणराव वाकुरे,दिलीप बनसोडे,सुनील माने,आशिष पवार,बप्पा माने,गणेश तावरे,अंगद कांबळे यासह प्रतिष्ठान चे पदाधिकारी व समाज बांधव यांनी केली आहे.
Comments
Post a Comment