रविवार असुन सुद्धा तहसीलदार सुहास हजारेंनी वस्तीवरील ग्रामस्थांची रस्त्याची अडचण सोडवली:- डॉ.गणेश ढवळे
बीड तालुक्यातील मौजे.सोमनाथवाडी येथील काही ग्रामस्थांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने वहित पाणंद रस्ता खोदून ठेवल्यामुळे कदमवस्ती, दाभाडे,जाधववस्ती,तावरे, इंगोले, शेळके आदी.२०० पेक्षा जास्त ग्रामस्थांना वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार बीड सुहास हजारे यांना फोनवरून कल्पना देत तसेच खोदलेल्या रस्त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवुन रस्ता खुला करून देण्यात यावा अशी विनंती केली होती.विनंतीला मान देऊन दुपारी तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी वंजारे, तलाठी कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पंचनामा करत रस्ता खोदणाराला नोटीस देण्याचे आदेश मंडळ अधिकारी, तलाठी यांना देऊन नेकनुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.व जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदलेला रस्ता पुर्ववत करून वस्तीकरांसाठी खुला करून देण्यात आला यावेळी डॉ.गणेश ढवळे, उपसरपंच किशोर शेळके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
तलावातील गाळ काढण्यास अडवल्यामुळे रस्ता जेसीबीने खोदला होता
गेल्या कित्येक वर्षांपासून वहिवाट असलेला व प्रशासनाने खर्च केलेला रस्ता आमच्या मालकी हक्काच्या शेतातून जात असुन ग्रामस्थांनी तलावातील गाळ नेण्यास अडलल्यामुळेच रस्ता खोदल्याचे सखाराम इंगोले, गणेश इंगोले, विक्रम इंगोले यांच म्हणणे आहे.
तातडीने रस्ता खुला केल्याबद्दल तहसीलदार सुहास हजारे यांचे आभार
रविवार असुन सुद्धा फोनवर केलेल्या विनंतीची दखल घेत तहसीलदार सुहास हजारे यांनी स्वतः स्थळ प़ंचनामा करत रस्ता खुला करून दिल्याबद्दल ग्रामस्थांसह डॉ.गणेश ढवळे यांनी तहसीलदार सुहास हजारे यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment