छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागांच्या योजनांचा जागर
सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )
जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती उपायोजना जनजागृती कार्यक्रम 2022 /23 लोककलेच्या माध्यमातून गावा गावात चालू
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लोकशाहीर प्रताप होनाजी जाधव . प्रवीण जाधव जामवंत इंगळे वैभव चव्हाण मनोहर चव्हाण पंडित जाधव प्रणिमा जाधव महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क कार्यालय या जनजागृती कार्यक्रम सावळदबारा येथे चक्रधर स्वामी मंदिर समोर पार पडला संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात गावागावात कलावंतांनी परिणामकारक कार्यक्रमाची सादरीकरण करून लोकांची मने जिंकली लोकशाहीर प्रताप जाधव प्रवीण जाधव या पथकातील कलावंताचे जनजागरण करणारी कार्यक्रम लोकांमध्ये जागृती व जनसंपर्क करीत आहे शिवशाहीर प्रवीण जाधव प्रताप जाधव यांच्या कलापथक व मनोरंजनातून येथा योग्य संदेश देणे हे या लोककलांचे वशिष्य आहे हाच हेतू समोर ठेवून जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे ग्रामीण भागात होणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क कार्यालया तर्फे करण्यात येत आहे पथकाने सोयगाव तालुक्यातील विविध गावात सावळदबारा देवारी नांदागाव डाभागाव टिटवी घाणेगाव तांडा इत्यादी गावात प्रबोधन करणारे कार्यक्रम पार पाडले
Comments
Post a Comment