कापूस दरवाढीची प्रतीक्षा किती दिवस पाहणार शेतकरी...?

कापूस दरवाढीची प्रतीक्षा किती दिवस पाहणार शेतकरी...? 


 पेरणीसाठी घेतलेले कर्ज- मुलांचे शिक्षण- लग्न समारंभासाठी लागणारा खर्च आणणार तरी कुठून..? 


 कापूस सोयाबीन दरामध्ये घट होत असल्याने शेतकरी, छोटे व्यापारी ही चिंतेत.....? 

 सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह 
    
      



मागिल सहा महिन्या पासून कापूस सोयाबीनचे दर प्रचंड प्रमाणात घसरलेले आहेत.मागच्या वर्षी दहा हजाराच्या पुढे कापूस तर सोयाबीनचे दर ७ हजार च्या आस पास होते शेतकऱ्याला गतवर्षीच्या भावाची अपेक्षा असतांना या वर्षी मात्र प्रत्यक्षात सोयाबीन ५ हजार तर कापूस सात हजाराच्या प्रति क्विंटल आसपास प्रमाणात दर स्थिर आहेत.यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीची प्रतीक्षा करायची किती दिवस हा प्रश्न उद्भवत आहे ?. शेतकऱ्याच्या पत्र्याच्या घरामधील सोयाबीन, कापसाचे वजन मोठ्या प्रमाणावर घसरत आहे तर पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेली कर्ज तर मुलांचे शिक्षण मुलाबाळाचे लग्न समारंभ पार पाडणार कसे .? या चिंतेमध्ये शेतकरी त्रस्त झाला आहे या भाववाढीच्या मानसिक दृष्ट्या त्रस्त झालेला घरातील करता माणूस पाहून सर्वच कुटुंब आर्थिक मानसिकताणामध्ये जगत आहे.


सोयगाव तालुका हा कोरडवाहू पिकांचे उत्पन्न घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो.प्रामुख्याने सोयगाव तालुक्यात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना प्राधान्य दिले जाते.यावर्षी सोयाबीन बऱ्यापैकी उत्पादित झालेले आहे तर कापसाचा उतारा मात्र मोठ्या प्रमाणात घसरलेला दिसून येतो.उत्पादित केलेला कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येऊन सहा महिने झाले तरी बाजारपेठेत म्हनावी तशी आवक दिसून येत नाही.त्याचे मुख्य कारण मागच्या वर्षी दहा हजाराच्या पुढे कापूस तर सोयाबीन ७ हजार दर गेले होते परंतु तेच दर यावर्षी मात्र कापूस सात हजाराच्या आसपास तर सोयाबीन पाच हजार रुपयांच्या आसपास असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अद्याप पर्यंत शेतकऱ्यांकडून घरातील शेत माल बाजारपेठेत न हलवता घरातच साठवून ठेवत दरवाढीची प्रतीक्षा केली जात आहे.परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस सोयाबीनचे दर वाढ होण्याची शक्यता दिसून येत नाही.घरात साठवून ठेवलेल्या सोयाबीन पिकास अक्षरशः उंदराकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे तर कापूस पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कापूस शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवल्यानंतर अक्षरशः या कापसाला किडे लागले आहेत.व्हपा नावाचे विशिष्ट किडे कापसावर आढळून येत असल्याने घरात साठवून ठेवलेल्या या कापसामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याची विशिष्ट एलर्जी निर्माण होत आहेत.अंग खाजवणे अंगावर लालसर चट्टे येणे या आजाराला घरात साठवून ठेवलेला कापूस आमंत्रण देत आहे.परंतु बाजारपेठेत कमी झालेले सोयाबीन कापसाचे दर हे शेतकऱ्यांना पिकवलेल्या कापूस सोयाबीन पिकास योग्य दर नसल्यामुळे घरातच ठेवण्याची वेळ आली असून किती दिवस वाट पाहावी लागणार या चिंतेमध्ये शेतकरी मानसिक आर्थिक दृष्ट्या त्रस्त झाला आहे.



उदरनिर्वाह चालतो शेतातील मालावरच....


शेतकऱ्यांनी पेरणी साठी घेतलेले कर्ज तसेच मुलांचा शिक्षणाचा खर्च आलेली लग्नसराई या सर्व अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत यामध्ये कापूस सोयाबीन इतर पिकांना भावच बाजारपेठेमध्ये नाही त्यामुळे किती दिवस भाव वाढीची वाट पाहायची व या समस्यातून मुक्ती घ्यायची हा मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे या समस्येने त्रस्त शेतकऱ्याला नवीन काही सुचत नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य मानसिक आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे.


भागवत थोटे पाटील - शेतकरी सोयगाव



कापसाचे छोटे व्यापारी अडकले भाव वाढीत...

सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या आडचणींसाठी बाजारपेठेमध्ये छोट्या व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस आज उद्या भाव वाढेल म्हणून व्यापाऱ्यांनी साठवून ठेवला परंतू भाववाढ दूरच तो रोजचच खाली येत आहे साडेसात ते आठ हजाराने खरेदी केलेला कापूस सात हजाराने कसा विकावा तूट कशी भरून काढायची असा प्रश्न छोट्या व्यापाऱ्यांना पडला आहे भाव वाढला नाही तर शेतकऱ्यांसोबत आनेक छोट्या व्यापाऱ्यांचे दिवाळे निघणार आहेत.

राजेंद्र भामरे व्यापरी - सोयगाव

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी