ईट ते गुंदा वडगाव गुंदावाडी ते वडगाव या रस्त्यासाठी आम आदमी पार्टी रस्ता रोको आंदोलन करणार-दादासाहेब सोनवणे, पिंपळनेर सर्कल प्रमुख आम आदमी पार्टी



बीड प्रतिनिधी :-बीड आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या विचाराने प्रेरित होऊन माननीय रंगाराचुरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्षआम आदमी पार्टी याच्या उपस्थितीत व भीमराव कुटे तालुका अध्यक्ष दादासाहेब सोनवणे पिंपळनेर सर्कल प्रमुख यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीच्या वतीने मोजे ईट ते वडगाव व गुंडवाडी ते वडगाव ता. जि. बीड हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 29 /07/ 2018 रोजी पूर्ण झाला परंतु इंजिनीयर गुत्तेदार यांच्या संघन मताने या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले तरी या रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे हमीपत्र आहे तरी गुत्तेदार व इंजिनियर या रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार नाहीत वारंवार सार्वजनिक बांधकाम मा. कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बीड महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था योजना बीड यांना देखील पत्राद्वारे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली हा रस्ता गुंदा वडगाव गुंदा वाडी गुंजाळा आडगाव या पाच गावचा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे या खराब रस्त्यामुळे सर्व गावकरी नागरिक महिला वृद्ध शाळकरी मुले सर्व हे त्रस्त आहेत या खराब रस्त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळाने देखील एसटी बस देण्यास नकार दिला आहे यामुळे या भागातील नागरिकांचे शारीरिक मानसिक व आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या सर्व गोष्टींना कंटाळून या सर्व गावकऱ्यांनी वारंवार विनंती करून देखील या कार्यालयाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम आदमी पार्टी चा नेतृत्वा मध्ये सर्व नागरिकांना सोबत घेऊन03/04/2023 सोमवार रोजी सकाळी 10.30 वा. बीड पिंपळनेर मुख्य रस्त्यावर छत्रपती संभाजीराजे चौक ईट ता.जि.बीड या ठिकाणी लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या आंदोलनासाठी व आपल्या रस्त्यासाठी रस्ता रोकोमध्ये सहभागी व्हावे आशा आशियाचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष भीमराव कुठे तालुका अध्यक्ष दादासाहेब सोनवणे पिंपळनेर सर्कल प्रमुख विक्रम नागरगोजे देवा गुंजाळ रामेश्वर गव्हाणे चंद्रकांत लहंगे लक्ष्मण वडगे नवनाथ जामकर विजय माने लक्ष्मण चेन्नई अशोक मोरे शहादेव घुगे सुरेश बनगर अण्णा गव्हाणे अंगद देवडकर नारायण घुगे प्रदीप शेलार इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी